Headlines

IND vs SL, 2ND Test | टीम इंडियामध्ये दुसऱ्या टेस्टसाठी मोठे बदल, कोणाला मिळणार संधी?

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL 2ND Test) 12 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. ही दुसरी टेस्ट डे-नाईट (Day Night Test) असणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. (ind vs sl test series 2nd match team india captain rohit sharma may give chance to axar patel in playing eleven on jayant yadav spot)  

कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्या टेस्टसाठी फिरकीपटू अक्षर पटेलला (Axar Patel) संधी देऊ शकतो. अक्षर आताच दुखापतीतून सावरुन फिट झाला आहे. यामुळे अक्षरला संधी मिळू शकते. 

अक्षरला संधी मिळाल्यास जयंत यादवला (Jayant Yadav) टीमबाहेर बसावं लागेल, हे निश्चित आहे. जयंतला पहिल्या मोहाली टेस्टमध्ये संधी मिळाली होती. मात्र त्याने निराशा केली.
  
जयंतने या सामन्यातील पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 11 ओव्हर्स टाकल्या. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.  त्यामुळे जयंत यादवला डच्चू मिळण्याची अधिक शक्यता आहे.

अक्षरला झालेल्या दुखापतीमुळे या मालिकेत कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र आता अक्षरच्या कमबॅकमुळे कुलदीपला वगळण्यात आलं आहे.

अक्षरने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये 36 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरने विशेष म्हणजे या 5 सामन्यात 5 वेळा प्रत्येकी एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय.  

तसेच अक्षरने बॅटिंग करताना 29 च्या सरासरीने 179 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. अक्षरने अवघ्या काही सामन्यांमध्येच संघातील दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा अक्षरला संधी देतो का, हे लवकरच स्पष्ट होईल. 

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ( अक्षर पटेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *