Headlines

IND vs SL 2nd Test | श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील (IND vs SL 2nd Test)  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने लंकेला विजयासाठी 447 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. मात्र श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 28 धावा केल्या आहेत. त्यामुळे लंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची आवश्यकता आहे. तर टीम इंडियाला श्रीलंकेला ‘व्हाईट वॉश’ देण्यासाठी 9 विकेट्सची आवश्यकता आहे. (ind vs sl 2nd test day 2 team india need 9 wickets and sri lanka needs 447 runs to win rishabh pant shreyas iyer shines at m chinnaswamy stadiums bangalore) 

श्रीलंकेने दुसऱ्या डावात लहिरु थिरुमानेच्या रुपात एकमेव विकेट गमावली. थिरुमानेला भोपळाही फोडता आला नाही. तर कर्णधार दिमुथ करुणारत्ने 10* तर कुसल मेंडिस 16 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने एकमेव विकेट घेतली. 

त्याआधी टीम इंडियाकडे दुसऱ्या डावात 143 धावांची आघाडी होती. तर दुसरा डाव हा 9 बाद 303 धावांवर घोषित केला. यामुळे लंकेला विजयासाठी 447 धावांच तगडं आव्हान मिळालं आहे. मात्र लंकेला आता विजयासाठी 419 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे टीम इंडियाने या सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. यामुळे उद्या सोमवारी सामन्याचा निकाल लागेल, अशी चिन्हं दिसत आहे.

टीम इंडियाचा दुसरा डाव

टीम इंडियाने दुसरा डाव हा 303 धावांवर घोषित केला. श्रेयस अय्यरने टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने वेगवान अर्धशतकी खेळी केली. तर श्रीलंकेकडून जयाविक्रमाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच पहिल्या डावात लंकेला 109 धावांवर गुंडाळल्याने टीम इंडियाला 143 धावांची मिळाली.

श्रीलंकेचा पहिला डाव 

टीम इंडियाने पहिल्या डावात केलेल्या 252 धावांना प्रत्युत्तर देताना लंकेचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला. पहिल्या डावात टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. 

तर अक्षर पटेलने एकमेव विकेट घेतली. पहिल्या डावात लंकेकडून एंजलो मॅथ्यूजने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली.  या व्यतिरिक्त एकालाही खास असं काही करता आलं नाही.  

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *