IND vs SL 2nd Test | कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत शमीच्या जागी या घातक गोलंदाजाला खेळवणार


मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL Test Series 2022) यांच्यात 12 मार्चला दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेत आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. रोहित नव्या खेळाडूंना संधी देत ​​आहे. रोहित अशातच दुसऱ्या कसोटीसाठी मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) जागी घातक गोलंदाजाचा समावेश करू शकतो. हा बॉलर कोण आहे, याबाबत आपण जाणून घेऊयात. (ind vs sl test series 2022 2nd test match captain rohit sharma mohammed shami may be replaced to umesh yadav in playing eleven)

श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीला विशेष काही करता आलं नाही. शमीच्या बॉलिंगवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी जबरदस्त धावा केल्या. शमीला फक्त 2 विकेट्सच घेता आल्या. त्यामुळे कॅप्टन रोहित दुसऱ्या टेस्टमध्ये शणमीच्या जागेवर उमेश यादवला (Umesh Yadav) संधी देऊ शकतो. 

उमेश यादव कोरड्या खेळपट्ट्यांवर चांगली गोलंदाजी करतो. तसेच अशा खेळपट्ट्यांवर त्याला अपेक्षित मदतही मिळते. यामुळे रोहित उमेशला संधी देतो का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.  
 
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणिअक्षर पटेल. Source link

Leave a Reply