Ind vs SA: टीम इंडियाला मिळणार नवा उपकर्णधार, रोहितच्या जागी हा खेळाडू करणार नेतृत्व


मुंबई : भारतीय संघ बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये ४ ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. 6 ऑक्टोबरपासून वनडे मालिका (ODI) सुरू होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, संजू सॅमसन वनडे मालिकेत संघात पुनरागमन करू शकतो. एवढेच नाही तर सॅमसनला (Sanju samson) उपकर्णधार बनवले जाऊ शकते. वनडे मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाची कमान सांभाळू शकतो.

भारतीय संघाला पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी (ICC T20 world cup) ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. त्याआधी विश्वचषक संघात समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर संजू सॅमसनसह देशांतर्गत क्रिकेटचे संघात पुनरागमन करू शकतात. निवडकर्त्यांनी टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा खूप आधी केली होती, मात्र त्यानंतर त्यांनी वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला नाही. येत्या काही दिवसांत भारतीय निवड समिती एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणाही करू शकतात.

संजू सॅमसन उपकर्णधार?

बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी एएनआयला सांगितले की सॅमसनला उपकर्णधार बनवले जाऊ शकते. सॅमसनला T20 विश्वचषकासाठी दुर्लक्षित केल्यानंतर चाहते प्रचंड संतापले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. 27 वर्षीय सॅमसन शेवटचा भारताकडून झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळला होता. भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा 3-0 असा पराभव केला. सॅमसनने भारतासाठी सात एकदिवसीय आणि 16 टी-20 सामने खेळले आहेत. तो सध्या न्यूझीलंड अ विरुद्धच्या घरच्या मालिकेत भारत अ संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारत-अ ने एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंड-अ चा 3-0 ने पराभव केला.

रजत पाटीदारला संधी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मध्य प्रदेशचा स्फोटक फलंदाज रजत पाटीदारलाही टीम इंडियात स्थान मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो नवा चेहरा असू शकतो. एवढेच नाही तर त्याला पदार्पणाची संधीही मिळू शकते. याशिवाय शुभमन गिलही टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये, दुसरा T20 गुवाहाटीमध्ये 2 ऑक्टोबरला आणि शेवटचा T20 इंदूरमध्ये 4 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबरला लखनऊमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबरला रांचीमध्ये आणि तिसरा एकदिवसीय सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद.



Source link

Leave a Reply