Headlines

IND VS SA: मॅन ऑफ द मॅच किताब मिळाल्यानंतर KL Rahul नं व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाला ” पुरस्काराचा मानकरी…”

[ad_1]

KL Rahul On Man Of The Match Award: टीम इंडियाने दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला (India Vs South Africa) 238 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेला 3 गडी गमवून 221 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेनं 16 धावांनी सामना गमावला. विजयानंतर ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार केएल राहुलला (KL Rahul) देण्यात आला. मात्र हा पुरस्कार मिळाल्याने त्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

केएल राहुल सामन्यानंतर म्हणाला, ‘मला आश्चर्य वाटते की मला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. खरं तर हा पुरस्कार सूर्याला मिळायला हवा होता.  त्याने खऱ्या अर्थानं सामन्याच रुपडं पालटलं. मधल्या फळीत फलंदाजी केली असल्याने मला माहिती की फलंदाजी करणं कठीण आहे. दिनेश कार्तिकला खूप डिलिव्हरी सामोरे जावे लागत नाही आणि तो अपवादात्मक होता.” केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांची खेळी खेळली.

भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि केएल राहुलने तुफानी फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकं ठोकली. राहुलच्या खेळीने विजयाचा पाया रचला होता. त्याचवेळी, सूर्यकुमार यादवने केवळ 22 चेंडूत 61 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्या खेळीमुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले.

IND Vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानात घुसला साप, पळापळ झाल्याचा Video Viral

दोन्ही संघ-
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *