Headlines

IND vs SA 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

[ad_1]

लखनऊ : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना सुरु होण्यास उशीर होणार आहे, अशी शक्यता निर्माण झालीय.  

बीसीसीआयने सांगितलं मॅचच नवीन टाईमिंग 
वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र पावसामुळे खेळाडूंची आणि फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण लखनऊमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे  दिवसभर पावसाची शक्यता असणार आहे. 

बीसीसीआयने सामन्याला उशीर झाल्याची माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘पावसामुळे सामना सुरु व्हायला उशीर होणार आहे. सामन्यापूर्वी मैदानाची पाहणी करण्यात आली. मॅच आणि टॉसची वेळ आता अर्ध्या तासाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नाणेफेक दुपारी 1.30 वाजता होणार आहे, तर सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.

लखनऊमध्ये 96 टक्के पावसाची शक्यता 
Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये गुरुवारी हवामान खूपच खराब असणार आहे.दिवसभर पावसाची शक्यता 96 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच अधूनमधून पाऊस पडत राहील. तसेच दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यताही 94 टक्क्यांपर्यंत आहे. या अर्थाने, सूर्यप्रकाश देखील दिसणार नाही. त्यामुळे अशा स्थितीत सामना होणे फार कठीण वाटते. 

टॉसला आणखी विलंब होणार
वनडे सामना दुपारी दीड वाजल्यापासून होणार आहे, तर दुपारी एक वाजता मुसळधार पावसाची शक्यता आहे. असे झाल्यास नाणेफेकीला आणखी विलंब होऊ शकतो. लखनौमध्ये दुपारी एक ते तीन या वेळेत सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान या सामन्यावर पावसाचे संकट असणार आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्याताही वर्तवण्यात येत आहे. 

दोन्ही संघ 
टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (डब्ल्यूके), संजू सॅमसन (डब्ल्यूके), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, जानेमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोरखिया, वेन पारनेल, एंडिले फेहलुक्वायो, प्रेवेसबायो, रबाडा, ड्वेनसो तबरेझ शम्सी.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *