IND vs NZ: वर्ल्ड कप तर जिंकायचाय, पण कीवींना हरवावं लागेल; कॅप्टन रोहितचं ‘सिक्रेट मिशन’


IND vs NZ 1st ODI : श्रीलंकेचा (Sri Lanka) चारीमुंड्या चीत केल्यानंतर आता टीम इंडियासमोर (Team India) तगडं आव्हान उभं राहिलंय. न्यूझीलंडचा संघ भारतात टीम इंडियाशी दोन हात करेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs NewZealand) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी रोजी हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. अशातच आता रोहित शर्माच्या मिशन सिक्रेटला सुरूवात झाली आहे. (ind vs nz series full schedule after thrashing srilanka india aim new zealands world no 1 crown see full time table venue squad)

श्रीलंकेला क्लिन स्वीप दिल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) टीम इंडिया चौथ्या स्थानी पोहोचली आहे. सध्या भारताचे 109  गुण आहेत. तर न्यूझीलंड 115 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तसेच इंग्लंड 113 गुणांसह दुसऱ्या तर 112 गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडचा धुंवा उडवून पहिलं नंबर वनचं स्थान प्राप्त करण्याचं लक्ष रोहितसेनेचं असणार आहे.

न्यूझीलंडचा भारत दौरा (ind vs nz series full schedule):

न्यूझीलंड आणि इंडिया (India vs New zealand) यांच्यातील पहिली वनडे 18 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये (IND vs NZ 1st ODI) खेळली जाईल. तर दूसरी (IND vs NZ 2nd ODI) वनडे 21 जानेवारी रोजी रायपुरमध्ये खेळवली जाणार आहे. तसेच तिसरा वनडे सामना 24 जानेवारीला इंदूर येथे खेळला जाईल, तिसरा सामना (IND vs NZ 3rd ODI) निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान तीन टी-ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत.

न्यूझीलंड वनडेसाठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (WK), हार्दिक पंड्या (VC), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

आणखी वाचा – Australian Open: ऐन सामन्यात राफेल नादालचं रॅकेट गायब, टेनिस कोर्टवर खळबळ; Video Viral

NZ T20I साठी भारताचा संघ:

हार्दिक पंड्या (C), सूर्यकुमार यादव (VC), ईशान किशन (WK), आर गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (WK), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझी चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.Source link

Leave a Reply