Headlines

IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ सीनियर खेळाडू संघातून बाहेर

[ad_1]

India vs New Zealand : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून त्यांनी नुकतीच टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सीनियर खेळाडू संघातून बाहेर झाला आहे. दरम्यान याबाबत अद्याप बीसीसीआयने (bcci) कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. मात्र तरीही हा खेळाडू संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : ‘हा खेळाडू आम्हाला परवडणारच नाही’, प्रसिद्ध खेळाडूने Suryakumar Yadav वर उधळली स्तुतीसुमने 

कोण आहे ‘हा’ खेळाडू?

न्यूझीलंडनंतर टीम इंडिया (India vs New Zealand) बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दोऱ्यात सर्व सीनियर खेळाडूही संघात वापसी करणार आहेत. मात्र टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला अपवाद ठरणार आहे. कारण जडेजा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यामुळे तो बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.अद्याप बीसीसीआय किंवा रवींद्र जडेजाने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.मात्र टीम इंडियाला हा मोठा धक्का मानला जात आहे.  

…तर मोठा धक्का

बांगलादेशविरुद्धची (Bangladesh) 2 कसोटी सामन्यांची मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सहभाग घेणे कठीण वाटतेय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आधी टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे, त्यामुळे रवींद्र जडेजा त्यात नसला तर हा मोठा धक्का आहे.

दरम्यान रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) आशिया कप 2022 दरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो स्पर्धेदरम्यानच बाहेर पडला होता. यानंतर तो टी20 वर्ल्डकप आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)  दौऱ्यातून बाहेर होता. आता तो बांगलादेश दौऱ्यातूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे. यावर आता बीसीसीआय काय माहिती देते हे पाहावे लागणार आहे. 

टीम इंडियाचा बांगलादेश दौरा 

  • 4 डिसेंबर, पहिला एकदिवसीय (ढाका) दुपारी 12.30 वाजता
  • 7 डिसेंबर, दुसरा वनडे (ढाका) 12.30 वाजता
  • 10 डिसेंबर, तिसरा एकदिवसीय (ढाका) दुपारी 12.30 वाजता
  • 14-18 डिसेंबर, पहिली कसोटी (चटगाव)
  •  22-26 डिसेंबर, दुसरी कसोटी (ढाका)

वनडे मालिकेसाठी  (Team India) टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल. 

कसोटी मालिकेसाठी (Team India) टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *