IND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी


India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा आणि शेवटचा टी20 सामना उद्या खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा (India vs New Zealand) पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकत मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी
न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत हरवण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) प्रयत्नशील आहे. यासाठी काही मोठे निर्णय घेण्याच्या तो तयारीत आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात Playing 11 मध्ये दोन आक्रमक खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यात संधी न मिळालेल्या उमरान मलिक (Umran Malik) आणि संजू सॅमसनला (Sanju Samsnon) उद्याच्या सामन्यात खेळवण्याची शक्यता आहे. 

ईशान आणि पंत ठरतायत फ्लॉप
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात ईशान किशन (Ishan Kishan) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना संधी देण्यात आली होती. पण या दोघांनाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. सलामीला आलेल्या ऋषभ पंतला केवळ सहा धावा करता आल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पंतच्याऐवजी धडाकेबाज संजू सॅमसनला संधी मिळू शकते.

शुभमन गिलही शर्यतीत
सीनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत शुभमन गिलही (Shubman Gill) सलामीसाठी प्रबळ दावेदार आहे. पण ईशान किशनला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे शुभमन गिलला एकदिवसीय सामन्यातच संधी मिळू शकेल. 

उमरान मलिक प्लेइंग इलेव्हनचा दावेदार
तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार हार्दिक पांड्या संघात अष्टपैलू खेळाडूंच्या समावेशावर अधिक भर देईल. अशाच दीपक हुड्डा हा चांगला पर्याय ठरू शकतो. वेगवान गोलंदाजीत मात्र हार्दिक पांड्या काही बदल करु शकतो. जम्मू-काश्मिरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे. अशाच उमरान मलिकसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी असेल.

कुलदीप यादवला टी20 मध्ये संधी नाहीच
टी20 वर्ल्ड कपमध्ये यजुवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) संघात निवड करण्यात आली, पण त्याला एकही सामना खेळवण्यात आला नव्हता. यावरुन टीम इंडियावर मोठी टीका झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात यजुवेंद्रला खेळवण्यात आलं आणि त्याने 4 षटकात 26 घावा देत 2 विकेटही घेतल्या. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी न देण्याची चूक केली हे त्याने दाखवून दिलं. दरम्यान, कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) टी20 मध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमीच आहे, त्यामुळे तो एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसेल.Source link

Leave a Reply