Headlines

IND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!

[ad_1]

IND vs NZ 3rd ODI: आगामी वर्ल्ड कपच्या (2023 World Cup ODI) पार्श्वभूमीवर टीम इंडिया कसून सामने रंगवत असल्याचं पहायला मिळतंय. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सिरीजमधील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाचं कंबरडं मोडलं आणि मोठी धावसंख्या उभारली आहे. या सामन्यात पुन्हा हिरो ठरतोय तो म्हणजे युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill). सिरीजमध्ये दुहेरी शतक आणि शेवटच्या वनडे सामन्यात शतक (Shubman Gill Century) ठोकणाऱ्या शुभमनने उल्लेखनीय कामगिरी केली. (IND vs NZ 3rd ODI Shubman Gill break Virat Kohli record for most runs in a bilateral series sports news)

आजचा सामना इंदूरमध्ये (Holkar Cricket Stadium) खेळवला जातोय. या सामन्यात रोहित शर्माची कॅप्टन इंनिंग पहायला मिळाली. अखेर 3 वर्षांच्या कालावधीनंतर रोहित शर्माने (Rohit sharma Century) वनडे सामन्यात शतक ठोकलं आहे. त्यामुळे रोहितच्या शतकांचा दुष्काळ संपला, असं म्हटलं जात आहे. रोहित एकीकडे आपली इनिंग साजरी करत असताना युवा शुभमनने दणक्यात शतक ठोकलं. या शतकानंतर शुभमनने किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे.

गिलने पहिल्या सामन्यात 212 धावा केल्या होत्या, तर या सामन्यातही शतक झळकावलंय. यासह त्यानं या मालिकेत आत्तापर्यंत 360 धावा केल्यात. तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम (Most runs in a bilateral series) याआधी बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर होता, ज्यानं 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 360 धावा केल्या होत्या, तर शुभमन गिलनेही तेवढ्याच धावा केल्या आहेत. या मालिकेत बाबरच्या विक्रमाची बरोबरी झाली आहे. तर विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम त्याने मोडीस काढलाय.

आणखी वाचा – Rohit Sharma Century : 1100 दिवसांचा दुष्काळ अखेर संपुष्टात; वनडे सामन्यात रोहित शर्माचं झुंझार शतक

दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli Record) भारतासाठी तीन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 286 धावा केल्या होत्या,त्यानंतर आता शुभमन गिलने 360 धावा करून त्याला मागं सोडलंय. त्यामुळे आता भारताला नवा स्टार मिळालाय, अशी चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता कॅप्टन रोहितनंतर (Rohit sharma) सलामीसाठी टीम इंडियाचं टेन्शन संपलंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *