IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक


IND Vs NZ LIVE: भारताचा संघ न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून टी 20 मालिका हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली जिंकली. आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार असून त्यामध्ये भारताचे कर्णधारपद शिखर धवन (Shikhar Dhawan) सांभाळणार आहे.  25 नोव्हेंबर 2022 म्हणजेच उद्यापासून टीम इंडिया आणि न्यूझिलंड (India vs New Zealand) यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. उद्या सकाळी सात वाजता ऑकलंडच्या (auckland) मैदानात पहिली मॅच पाहायला मिळणार आहे. पण या सामन्याआधी एक बातमी समोर येत आहे.   

न्यूझीलंडवर (New Zealand)  टी 20 सीरीजमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियासमोर (team India) आता वनडे सीरीजच आव्हान आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनवर विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल. पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी आता टीम इंडियासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल कारण यावेळी भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे आणि टीम इंडियाला ही ट्रॉफी जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. मात्र उद्या होणाऱ्या सामन्याआधीच न्यूझिलंडमध्ये (NZ) अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी (25 नोव्हेंबर 2022) उद्याच्या  मॅचमध्ये पाऊस पडणार का ? असा प्रश्न असंख्य क्रिकेटप्रेमींना पडला असेल, परंतु हवामान खात्याने उद्याच्या मॅचमध्ये स्वच्छ हवामान राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्याची पुर्ण मॅच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 

तसेच विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं नेतृत्व धवनकडे देण्यात आलं आहे. धवनच्या नेतृत्वाच टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

वाचा: Corona रिटर्न्स, अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध जाहीर

 एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

पहिली वनडे – 25 नोव्हेंबर, ईडन पार्क ऑकलंड
दुसरी वनडे – 27 नोव्हेंबर, सेडन पार्क, हॅमिल्टन
तिसरी एकदिवसीय – 30 नोव्हेंबर, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च

हार्दिक पांड्या संघात नसणर

या वनडे मालिकेत हार्दिक पांड्या संघाचा भाग नसणार. संघाची कमान शिखर धवनकडे तर उपकर्णधार ऋषभ पंतकडे आहे. उदयोन्मुख वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला या मालिकेत संधी मिळू शकते, ज्याने आयपीएल 2022 मध्ये राजस्थानकडून खेळताना शानदार गोलंदाजी केली.

भारताचा एकदिवसीय संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

न्यूझीलंड एकदिवसीय संघ : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.Source link

Leave a Reply