Headlines

IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं, जाणून घ्या

[ad_1]

IND vs NZ 1st T20 :  भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 21 धावांनी पराभव झाला आहे. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने या सामन्यात भारताला 178 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला अवघ्या 155 धावा करता आल्या. काही कारणांमुळे भारताचा पराभव अटळ होता.  (IND vs NZ india lost match this 3 main reasons latest marathi sport news)

कारण 1: भारताीय वेगवान गोलंदाजांना आलेलं अपयश, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशिया कप आणि टी-20 वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंहने तब्बल 51 धावा दिल्या. सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये अर्शदीप सिंहने तब्बल 27 धावा  मोजल्या. 6N, 6, 6, 4, 0, 2, 2 या धावा भारताला महागात पडल्या. भारताचा पराभव हा 21 धावांनी झाला आहे. 

कारण 2 :  न्यूझीलंडने भारताला दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात निराशाजनक झाली. सूरूवातीला फलंदाजीला आलेल्या ईशान किशन 4 धावा, शुभमन गिल 7 धावा, राहुल त्रिपाठी 0 शून्य धावा करून परतले. सूर्यकुमार बाद झाल्यावर हार्दिकही बाद झाला. जर हार्दिक मैदानावर टिकून राहिला असता तर वॉशिंग्टन सुंदलाही मदत झाली असती. दोघे मैदानावर असते तर एखादं मोठं षटक आलं असतं तर सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता.

कारण 3 : भारतीय वेगवान गोलंदाज पूर्णपणे फेल गेलेले दिसले. स्ट्राईक बॉलर असलेल्या एकट्या अर्शदीपला 51 धावा.  उमराम मलिकने एकाच षटकामध्ये तब्बल 16 धावा तर शिवम मावीने 2 षटकांमध्ये 19 धावा दिल्या. सामन्यामध्ये युवा असल्यामुळे आव्हानाचा पाठलाग करताना आलेलं दडपण हेसुद्धा त्यातीलच एक कारण असावं. 

दरम्यान, भारताकडून सूर्यकुमार यादवने 47 धावा तर वॉशिंग्टनने 50 धावा केल्या. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. ईशान किशनला संधी दिल्यामुळे बाहेर बसावं लागलेल्या पृथ्वी शॉला दुसऱ्या सामन्यात अंतिम 11 मध्ये स्थान द्यावं अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *