Headlines

IND vs NZ : भारत प्रथम करणार फलंदाजी; Rohit Sharma ने ‘या’ खेळाडूला केलं टीम बाहेर

[ad_1]

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड  (IND vs NZ) यांच्यामधील वनडे सिरीजचा (Third ODI IND vs NZ) शेवटचा सामना आज होतोय. इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात असून या सीरिजमध्ये 2-0 ने टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टॉस झाला न्यूझीलंडने जिंकला असून टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठा निर्णय घेत एका मॅचविनर खेळाडूला पुन्हा टीममध्ये संधी दिलेली नाही.

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांच्या सीरिजचा आज शेवटचा सामना रंगला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा दबदबा पहायला मिळाला. दुसरी वनडे 8 विकेट्सने जिंकून भारताने सीरिजवर कब्जा केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडिया क्लीन स्वीप देण्याच्या मनस्थितीत आहे. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्ये बदल केले आहेत.

न्यूझीलंडच्या टॉमने जिंकला टॉस (new zealand win toss)

तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या टॉम लेथमने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी रोहित शर्माने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहलला पुन्हा टीममध्ये संधी दिलेली नाही.

भारतीय क्रिकेट टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर

न्यूझीलंड क्रिकेट टीम

फिन एलन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, टॉम लेथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर, लॉकी फर्ग्यूसन, डग ब्रेसवेल

तिसऱ्या सामन्यातही Yuzvendra Chahal ला प्लेईंग 11 मध्ये संधी नाही

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या सीरिजमध्ये 2 सामने खेळवले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये युझवेंद्र चहलला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात रोहित चहलला संधी देण्याची शक्यता होती. मात्र तसं झालं नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *