IND vs NZ : Hardik Pandya चं मोठं पाहिलंत का? बस ड्रायव्हर दिलं खास गिफ्ट


IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 सामन्याची सिरीज जिंकली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उर्वरित दोन सामन्यामध्ये टीम इंडियाने (Team India) सिरीजवर 2-0 असा कब्जा केला. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर (Social Media) हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये हार्दिक पंड्याचं मोठं मन पुन्हा एकदा दिसून आलं आहे. यावेळी पांड्याने बस ड्रायव्हरला एक खास गिफ्ट दिलं आहे. 

Hardik Pandya चं मोठं मन

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी केली. खेळामुळा लाइमलाईटमध्ये असतानाच तो मनाच्या मोठेपणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्याने बस ड्रायव्हरला स्पेशल गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट दुसरं तिसरं काही नसून त्याची स्वाक्षरी असलेली टीम इंडियाची जर्सी होती. हे गिफ्ट मिळाल्यानंतर बस ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरा आनंद स्पष्टपणे झळकत होता. 

हार्दिक पांड्याची जर्सी मिळाल्यानंतर बस ड्रायव्हरने त्याचं भरपूर कौतुक केलं आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, तो बऱ्याच काळापासून बस चालवतोय, परंतु एखाद्या खेळाडूने असा व्यवहार पहिल्यांदाच केला. भारताच्या कर्णधाराने ही जर्सी मला दिली आहे आणि यावर इतर खेळाडूंची ऑटोग्राफ आहे.”

रविवारी दुसरा वनडे सामना

टीम इंडियाने न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये पावसाचा अडथळा होता. अशातच उद्याच्या सामन्यात देखील पावसाचा खेळ होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हेमिल्टनमध्ये होणाऱ्या सामन्याच्या वेळी 100 टक्के पावसाची शक्यता आहे. दोन्ही टीम्समध्ये हा सामना न्यूझीलंडच्या वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळवण्यात येणार आहे. तर भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता हा सामना होणार आहे.

टीम इंडियाचा खराब रेकॉर्ड 

टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरा सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. टीम इंडियाने येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.तर न्यूझीलंडने उर्वरित ६ सामने जिंकले आहेत.Source link

Leave a Reply