IND vs NZ :BCCI ने ‘ती’ चुक सुधारली, टीम इंडियात मॅच विनर खेळाडूची एंट्री


India vs New Zealand 2023 : टीम इंडियाने श्रीलंकेचा (India vs New Zealand) वनडे मालिकेत 3-0 ने पराभव केला. या मालिकेनंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध तीन वनडे आणि टी20 सामन्य़ासाठी सज्ज झाली आहे. या सामन्याआधी टीम इंडियात (Team India)एका स्टार खेळाडूची एंट्री झाली आहे. या खेळाडूने टीम इंडियाला अनेकदा आपल्या बॉलिंग आणि बॅटींगच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आता हा खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात मोलाची भूमिका बजावताना दिसणार आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे? अशी चर्चा सुरु झाली आहे.  

श्रीलंकेविरूद्ध संघातून वगळलं

नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत या खेळाडूला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला मॅच विनर खेळाडूची कमतरता जाणवत होती. ही चूक आता बीसीसीआयने (BCCI)न्य़ूझीलंडविरूद्धच्या सामन्यात सुधारली आहे. त्यांनी मॅच विनर खेळाडूला संघात संधी दिली आहे. टीम इंडियाचा हा मॅच विनर खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शार्दुल ठाकूर आहे. शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) आगमनाने टीम इंडियाला एकाच खेळाडूमध्ये फलंदाज आणि गोलंदाजाची जोड मिळणार आहे. ज्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चांगला साधता येणार आहे.

न्यूझीलंडविरूद्ध संधी

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) सुरुवातीच्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अत्यंत धोकादायक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. शार्दुल ठाकूरने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यानंतर त्याची श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत निवड झाली नाही, परंतु निवडकर्त्यांनी या खेळाडूला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संधी दिली.

टीम इंडियाचा गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. शार्दुल ठाकूरने आतापर्यंत भारतासाठी 8 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 27 विकेट घेतले आहेत.शार्दुल ठाकूरच्या नावावर 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44 आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 33 विकेट घेण्याचा विक्रम आहे. शार्दुल ठाकूरमध्ये चांगली फंलदाजी करण्याची क्षमता आहे. खालच्या फळीत उतरून तो चांगली फलंदाजी करू शकतो. 

दरम्यान टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवार, 18 जानेवारी रोजी हैदराबाद येथे दुपारी 1.30 वाजेपासून खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू शार्दुल ठाकूर कशी कामगिरी करतो? हे पाहावे लागणार आहे. 

वनडेसाठी टीम इंडिया :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

टी-20 साठी टीम इंडिया :

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.

सामन्यांचे वेळापत्रक

वनडे मालिका 

  • पहिला एकदिवसीय, 18 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, हैदराबाद
  • दुसरी वनडे, 21 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, रायपूर
  • तिसरी वनडे, 24 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, इंदूर

T20 मालिका

  • पहिला T20 सामना, 27 जानेवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, रांची
  • दुसरा T20 सामना, 29 जानेवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, लखनौ
  • तिसरा T20 सामना, 1 फेब्रुवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, अहमदाबादSource link

Leave a Reply