IND vs NZ 3rd ODI: भारत न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश देणार, कधी- कुठे पाहाल तिसरा वनडे सामना?


IND vs NZ 3rd ODI Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा वनडे सामना आज (24 जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला होता. जर टीम इंडियाने आजचा सामना पण जिंकला तर मालिकेत 3-0 ने आघाडी घेऊन न्यूझीलंडला व्हाईट वॉश (Whitewash) देण्याची सुवर्णसंधी भारताकडे असेल.  यासोबतच भारतीय संघाला आयसीसी एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना टीम इंडियाने 12 धावांनी जिंकला होता. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून हा सामना 8 विकेट्सने जिंकला होता. दोन्ही सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाला ही मालिका आपल्या नावावर कोरायची आहे. मात्र आजही तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही टीम इंडिया न्यूझीलंडलाही व्हाईटवॉश देण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

 

व्हाईट वॉश किंवा क्लीन स्वीप म्हणजे काय? 

संपूर्ण मालिकेतील प्रत्येक सामन्यात एका संघाने दुसऱ्या संघाचा पराभव करून दुसऱ्या संघाला एकही सामना जिंकण्याची संधी दिली नाही, तर त्याला व्हाईट वॉश किंवा क्लीन स्वीप म्हणतात, या दोन्हीचा अर्थ एकच आहे. 

कधी होणार सामना

इंदोर येथील होलकर स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना रंगणार आहे. या सामन्याला दुपारी 1:30 वाजता सुरूवात होईल. तसेच त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. 

कुठे पहाल सामना

हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या (Star Sports) विविध चॅनेल्सवर पाहू शकता. तसेच हॉट्स स्टार (Hots star) अँपवर देखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.  

भारताचे संभाव्य प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

न्यूझीलंडचे संभाव्य प्लेइंग -11: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (c/wk), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर. Source link

Leave a Reply