IND vs IRE: बुमराहसारख्या घातक बॉलरची आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात एन्ट्री


मुंबई : एक टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरी टीम आयर्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर आता आयर्लंड दौरा करायचा आहे. टीम इंडियाची कमान या दौऱ्यात हार्दिक पांड्याकडे असणार आहे. या निमित्ताने हार्दिक पांड्याचं टीम इंडियासाठीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. 

टीम इंडियाला यावेळी आयर्लंड दौऱ्यासाठी बुमराहसारखाच घातक खेळाडू मिळाला आहे. ज्याने आयपीएलमध्ये आपल्या बॉलिंगने धुमाकूळ घातला होता. त्याने हार्दिक पांड्या, धोनीसारख्या सीनियर प्लेअर्सच्या विकेट काढल्या होत्या. 

दक्षिण आफ्रिकेनंतर आयर्लंड मालिकेसाठी युवा खेळाडूही मॅनेजमेंटची पहिली पसंत ठरू शकते. या मालिकेत अर्शदीप सिंहला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

हा खेळाडू आयपीएलमध्ये घातक बॉलिंग करताना दिसला. अर्शदीप शेवटच्या ओव्हर्समध्ये बुमराहसारखा अचूक यॉर्कर टाकण्यात माहीर आहे. त्याने आयपीएलमध्ये 14 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 2019 मध्ये डेब्यू केला. आतापर्यंत त्याने 39 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. 

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये कोणाला संधी? 
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिकSource link

Leave a Reply