Headlines

IND vs Eng, 5th Test | Cheteshwar Pujaraचं टीम इंडियातं कमबॅक, रहाणेला डच्चू

[ad_1]

मुंबई : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. (ind vs eng 5th rescheduled test match cheteshwar pujara comeback in team india ajinkya rahane give again ignore)  

टीम इंडिया इंग्ंलंड दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध उर्वरित 5 वा सामना खेळणार आहे. या 5 व्या सामन्याच्या निमित्ताने संघात टीम इंडियाचा तारणहार असलेल्या चेतेश्वर पुजाराची एन्ट्री झाली आहे. तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे सातत्याने अपयशी ठरत होते. त्यामुळे या दोघांना श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पुजाराने काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये धमाका केला. 

पुजाराने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना सलग 4 शतकं ठोकण्याचा पराक्रम केला. पुजाराने या खेळीसह आपली दावेदारी सिद्ध केली. पुजाराने या खेळीसह आपल्याला राहुल द्रविडचा वारसदार का म्हणतात, हे सिद्ध केलं. तसेच निवड समितीला संधी देण्यास भाग पाडलं.

पाचवा सामना केव्हा? 

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना हा 1-5 जुलै दरम्यान पार पडणार आहे. 

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2021 मध्ये इंग्लंडमध्ये 5  टेस्ट मॅचच्या सीरिजचं आयोजन करण्यात आलं होतं. या 5 पैकी 4 सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पाचवा सामन्याचं फेरनियोजन करण्यात आलं.  टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. 

इंग्लंड विरुद्धच्या 5 व्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *