Headlines

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, ‘या’ दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

[ad_1]

ICC T20 World Cup 2022: भारत आणि बांगलादेशदरम्यान (India vs Bangladesh) 2 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियातल्या (Australia) अॅडलेडमधल्या ओव्हल मैदानावर (Adelaide Oval Cricket Ground) सामना खेळवला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला (Team India) बांगलादेशचा पराभव करावाच लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Ind vs SA) सामन्यात भारताला 5 विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) मोठे बदल करु शकतो. काही स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. 

अशी असेल सलामीची जोडी
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup) के एल राहूलला (K L Rahul) समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या तीनही सामन्यात केएल राहुलला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींनी राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे. पण टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रोहित शर्माबरोबर केएल राहुलच सलामीला उतरेल असं स्पष्ट केलं आहे.

नंबर तीनवर विराटच
भारतीय संघात नंबर तीनसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपली जागा पक्की केली आहे. नंबर तीनवर खेळताना विराटने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. विराट फॉर्मात असल्यास कोणत्याही टीमसमोर, कोणत्याही गोलंदाजासमोर तो धावा करु शकतो. सध्या विराट जबरदस्त फॉर्मात आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक ठोकलं.

अशी असेल मिडल ऑर्डर
चौथ्या नंबरसाठी धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी मिळू शकते. गेल्या काही सामन्यात सूर्यकुमारने दमदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने एकहाती झुंज देत 68 धावा केल्या. पाचव्या नंबरसाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपली जागा पक्की केली आहे. विकेटकिपरची जबाबदारी यावेळी ऋषभ पंतला (Rishabh Pant) मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) दुखापतग्रस्त झाला होता.

या गोलंदाजांवर जबाबदारी
गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असेल. त्यांना साथ मिळेल ती अर्शदीप सिंहची. टी20 वर्ल्ड कपमध्ये अर्शदीप सिंह सध्या चांगलाच फॉर्मात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंहने मॅच विनिंग कामगिरी केली होती. 

हे खेळाडू होऊ शकतात बाहेर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रवीचंद्रन अश्विन (Ravinchandran Ashwin) चांगलाच महागडा ठरला होता. त्याने चार षटकात तब्बल 43 धावा दिल्या. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अश्विनऐवजी यजुवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी मिळू शकते. तर दीपक हुड्डाच्या (Deepak Hooda) जागी अष्टपैलू अक्षर पटेलला (Axer Patel) प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताची संभाव्या प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *