Headlines

IND vs BAN : नशीब खराब! ‘या’ खेळाडूचे वयाच्या 29 व्या वर्षीचं करिअर संपले, रोहित-द्रविडनेही फिरवली पाठ

[ad_1]

India Test Team: बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (IND vs BAN 1st Test)  टीम इंडियाने 188 रन्सने विजय मिळवला आहे. दोन्ही टीमच्या मध्ये अजून एक टेस्ट सामना बाकी आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. याचदरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे टीम इंडियातील एका खेळाडूसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे बंद होताना दिसत आहेत. कारण या खेळाडूकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे. 

टीम इंडिया (team India) आजकाल अत्यंत आक्रमक पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळत आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आपल्या झंझावाती खेळाच्या जोरावर भारतीय कसोटी संघात फलंदाजीत 6 व्या स्थानावर कब्जा केला आहे. यासह क्रिकेटपटू हनुमा विहारीचे (Hanuma Vihari) कसोटी संघातील स्थान हिसकावण्यात आले आहे. श्रेयस अय्यरच्या आधी भारतीय कसोटी संघात हनुमा विहारीला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळायची, पण आता ती संधी मिळत नाही. तो खेळाडू म्हणजे हनुमा विहारी…

या खेळाडूचे करियर संपले?     

हनुमा विहारीबद्दल (Hanuma Vihari) सांगायचे झाले तर, श्रेयस अय्यरच्या तुलनेत त्याची फलंदाजी खूपच संथ आहे आणि कसोटी क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नाही. कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही हनुमा विहारीला कसोटी संघात संधी देणे बंद केले आहे. 

रोहित-द्रविडनेही पाठ फिरवली

श्रेयस अय्यरने भारतासाठी आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 50.8 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 508 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. तर दुसरीकडे हनुमा विहारीने Hanuma Vihari) फलंदाजाच्या तीन वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक केले नाहीत. 

हनुमा विहारी यांनी भारतासाठी शेवटचा कसोटी सामना या वर्षी जुलैमध्ये बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात हनुमा विहारी वाईटरित्या फ्लॉप ठरला. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हनुमा विहारीला पहिल्या डावात केवळ 20 धावा आणि दुसऱ्या डावात केवळ 11 धावा करता आल्या. गेल्या तीन वर्षांत या फलंदाजाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक नाही.  

पुन्हा कसोटी संघात स्थान मिळणे कठीण

श्रेयस अय्यरने भारतीय कसोटी संघात मिळालेल्या संधीचे सोने केले आणि 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना आपले स्थान पक्के केले. आता भारतीय कसोटी संघात हनुमा विहारीला स्थान नाही. सर्व संघ कसोटी सामना अनिर्णित ठेवण्याऐवजी निकालासाठी आक्रमक क्रिकेट खेळत आहेत. श्रेयस अय्यर असताना हनुमा विहारीला पुन्हा कसोटी संघात स्थान मिळणे खूप कठीण आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *