Headlines

IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 8-8 ओव्हरचा सामना, मोठी अपडेट समोर!

[ad_1]

IND vs AUS :  टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील (IND vs AUS) तीन टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज शुक्रवारी नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्याआधीच पाऊस पडल्याने टॉस पुढे ढकलला होता. अशातच आता सामन्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सामन्यासाठी परिस्थिती परिपूर्ण नसली तरी, नाणेफेक भारतीय वेळेनुसार रात्री 9:15 वाजता होईल, अशी माहिती अँम्पायर्सने दिली आहे. रात्री 9:30 वाजता सामना सुरू होईल. प्रत्येक बाजूने आठ ओव्हर टाकल्या जातील, पॉवरप्लेमध्ये 2 ओव्हर असतील आणि एक गोलंदाज जास्तीत जास्त 2 ओव्हर टाकू शकतो.

सुरूवातीला होणारा 6.30 चा टॉस 7 वाजता होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र आता 7 वाजता देखील टॉस होऊ शकला नाही. त्यामुळे दोनदा टॉस होऊ न शकल्याने या सामन्यासंदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. 

दुसऱ्या टी20 सामन्याचा टॉस 6.30 वाजता होणार होता. मात्र ओल्या आऊटफिल्डमुळे 6.30 वाजता होणारे नियोजित टॉस पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी 7 वाजता अंपायर्सने मैदानाची पाहणी करून टॉस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यानंतरही मैदान पूर्णपणे कोरडे होऊ शकले नसल्याने टॉसचा वेळ पुन्हा पुढे ढकलण्यात आला होता.

दोन्ही संघ-

टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल/दीपक चहर, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झम्पा.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *