IND vs AUS, 2nd T20 : पीच सुकवण्यासाठी चक्क हेअर ड्रायअरचा वापर?


नागपूर :  पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामना (IND vs AUS, 2nd T20) अपेक्षित वेळेत सुरु होऊ शकला नाही. या सामन्याला अखेर पाऊस थांबल्यानंतर 9 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात झाली. पावसामुळे 20 ओव्हर्सचा असलेला सामना हा थेट 12 ओव्हरने कमी करुन वेळेअभावी 8 ओव्हर्सचा ठेवण्यात आला. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत असा दावा करण्यात आलाय की पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी सुकवण्यासाठी ग्राउंड स्टाफकडून चक्क हेअर ड्रायरचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. (fact check ind vs aus 2nd t20i hair dryer used for pitch in nagpur know what true what false)

नक्की खरं काय? 

व्हायरल होत असलेले फोटो हे नागपुरातले नाहीत.  कारण इथे पावसामुळे पीच नाही, तर मैदानात भिजल्याने सामन्याला सुरु होण्यात उशीर झाला. व्हायरल फोटो हे 2020 मधील आहेत.   

व्हायरल फोटो कधीचे?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुवाहाटीत 2020 मध्ये टी 20 सामना आयोजित करण्यात आला. मात्र सामन्याआधी तिथे जोरदार पाऊस झाला. पाऊस थांबल्यानंतर टॉस झाला. मात्र तोवर पाणी पिचवर गेलं.  त्यामुळे पाणी सुकवण्यासाठी चक्क हेअर ड्राअरचा वापर करण्यात आला होता. तेव्हाचे फोटो आता नागपूरचे असल्याचं सांगून व्हायरल केलं जात आहे. जे की खोटं आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन : 

ऑस्ट्रेलिया : एरोन फिंच (कॅप्टन), कॅमरन ग्रीन, स्टीवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट, टीम डेविड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, डेनियल सॅम्स, एडम झॅम्पा आणि जोश हेझलवुड. 

टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल. Source link

Leave a Reply