Headlines

झाडबुके महाविद्यालयाचा विद्यार्थी कुलभूषण कंदले याचा सन्मान

बार्शी – प्रतिनिधी – श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचा विद्यार्थी कुलभूषण कंदले हा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांमध्ये महाविद्यालयात बीएससी भाग एक, दोन व तीन मध्ये एकसलग प्रथम क्रमांक मिळवता आला आहे, त्याच्या या यशाचे कौतुक म्हणून बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. वर्षाताई झाडबुके यांच्याकडून तीन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.आज दिनांक 30 सप्टेंबर 2021 वार गुरुवार रोजी महाविद्यालयामध्ये करण्यात आला.

त्याचप्रमाणे मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रिय संस्थेकडून कुलभूषण कंदले याला सोसायटीचे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या निमित्ताने झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोज गादेकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.सौ. अरूषा नंदीमठ यांनी कौतुक केले, या सोबतच विभागाच्या प्रा. डॉ.नमिता डोईफोडे यांनी देखील अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *