Headlines

ध्येयवादी दृष्टिकोन स्वीकारल्यास कार्य सिध्दी होते – माजी उपप्राचार्या डॉ. गुलशन शेख यांचे प्रतिपादन

सोलापूर / प्रतिनिधी – ध्येयवादी दृष्टिकोन स्वीकारल्यास कार्य सिध्दी होते. असे विचार सेंट झेवियर्स स्वायत्त कॉलेज, मुंबई येथील माजी उपप्राचार्या डॉ. गुलशन शेख यांनी मांडले.संगमेश्वर कॉलेजमधील अंतर्गत गुणवत्ता हवी कक्षाच्या वतीने आयोजित पाच दिवसांच्या फॅकल्टी डेव्हपमेंट प्रोग्राम अंतर्गत पहिल्या दिवसाच्या सत्रात त्या बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या की महाविद्यालयीन स्तरावर अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन या महत्वाच्या गोष्टी असतात. यामध्ये विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शिक्षकाने प्रामाणिक प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या शिकविण्याचे ध्येय निश्चित केले पाहिजे ते ध्येय साध्य करण्यासाठीचा उद्देश निश्चित करायला हवा, त्यासाठी नियोजनबद्ध कार्य करायला हवे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अध्यापनाचे कार्य केल्यास निश्चित केलेल्या ध्येयाची सिद्धी नक्कीच होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य होत्या. तसेच मॅनेजमेंट सदस्य प्रा. ज्योती काडादी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. वंदना पुरोहित, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस.डी. गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डी. एम. मेत्री यांनी केले. आभार नॅकचे समन्वयक डॉ. आर.व्ही देसाई यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. बुक्का यांनी केले. या कार्यशाळेत विविध विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थिती होते.

Leave a Reply