Headlines

ICC Women’s World Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाने अशी साजरी केली होळी

[ad_1]

मुंबई : विश्वचषकातील पाचव्या सामन्यात भारतीय महिला संघ शनिवारी ऑस्ट्रेलियन संघाशी भिडणार आहे. हा संघ सध्या 4 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. हा सामना ईडन पार्क ऑकलंड येथे खेळवला जाणार आहे. पण त्याआधी संघातील सर्व खेळाडूंनी होळी साजरी केली. BCCI च्या महिला ट्विटर हँडलने एक फोटो ट्विट केला आहे. ऑकलंडमध्ये सराव केल्यानंतर संघाने होळी साजरी केली. भारतीय महिला संघाने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा स्पर्धेच्या दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि सगळ्या ओव्हर्स ही खेळता आले नाही. सामन्यानंतर वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) आणि कर्णधार मिताली राज (Mitali Raj) या दोघांनीही पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरले.

अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला वेस्ट इंडिजच्या सामन्यातील फलंदाजीची पुनरावृत्ती करावी लागेल जिथे स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर संघाने 300 हून अधिक धावा केल्या आणि 155 धावांनी विजय मिळवला.

झुलनची 200 वी वनडे

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अनुभवी झुलन गोस्वामीसाठी खूप खास असणार आहे, कारण हा तिच्या कारकिर्दीतील 200 वा एकदिवसीय सामना असेल. अशा स्थितीत संघाला तिला विजयाची भेट द्यायला आवडेल. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातच झुलनने कारकिर्दीतील 250 वी विकेट घेत विश्वविक्रम केला.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या रथावर स्वार आहे. संघाने 4 पैकी 4 सामने जिंकले असून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. यापूर्वी त्यांनी इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा पराभव केला आहे.

टीम इंडियाने शुक्रवारी रंगांची होळी खेळली पण त्यांना विजयाची होळी खेळायची असेल तर त्यांना त्यांच्या फलंदाजीची ताकद दाखवावी लागेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *