Headlines

Icc Test Rankings | रवींद्र जाडेजाची नंबर 1 कामगिरी, तर विराटने रोहितला पछाडलं

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत (ind vs sl 1st test) शानदार कामगिरी केली. जाडेजाने या पहिल्या टेस्टमध्ये 175 धावांची नाबाद खेळी केली. तसेच 5 विकेट्स घेतल्या. जाडेजाला या कामगिरीचा आयसीसी टेस्ट रॅंकिगमध्ये (Icc Test Rankings) जबरदस्त फायदा झाला आहे. आयसीसीने नुकतीच ताजी कसोटी क्रमवारी जारी केली आहे. यामध्ये जाडेजासह विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा फायदा झाला आहे. (ind vs sl test series icc test ranking ravindra Jadeja has returned to top of all rounder rankings virat kohli overtake to rohit sharma)

जाडेजा अव्वल स्थानी 

जाडेजाने वेस्टइंडिजच्या जेसन होल्डरला (Jason Holder) पछाडत ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर रवीचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

जाडेजाला ऑलराऊंडर रँकिंगमध्ये 2 स्थानांचा मोठा फायदा झाला आहे. जाडेजाचे 406 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. जड्डूने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात धमाका केला होता. 

जाडेजाने 228 बॉलमध्ये 178 फोर आणि 3 खणखणीत सिक्ससह नाबाद 175 धावा केल्या. तर पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 5 आणि 4 अशा एकूण 9 विकेट्स घेतल्या. जाडेजाला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

बॅटिंग रँकिंगमध्येही धमाका 

जाडेजाला ऑलराउंडर रँकिंगसह बॅटिंग क्रमवारीतही फायदा झाला आहे. जाडेजाने 17 क्रमांकाने मोठी उडी घेत 37 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर बॉलिंग रँकिंगमध्ये 3 स्थानांच्या फायद्यासह 17 व्या क्रमांकावर पोहचला आहे.  

विराटाने रोहितला पछाडलं

फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाकडून पहिल्या स्थानी विराट कोहली आहे. विराटने 2 स्थानांची उडी घेत 5 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर कॅप्टन रोहित शर्मा 6 व्या स्थानी कायम आहे. याचाच अर्थ असा की, विराटने रोहितला मागे टाकलंय.  

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *