Headlines

ICC Rule Change: T20 वर्ल्डकपपूर्वी आयसीसीने क्रिकेट नियमात केले मोठे बदल, आता Catch घेतल्यानंतर…

[ad_1]

ICC Cricket Rules 2022​: पुढच्या महिन्यात आयसीसी टी 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. टी 20 वर्ल्डकप 2022 च्या (T20 World Cup 2022)  सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यानंतर वर्ल्डकपमधील वाटचाल सुरु होणार आहे. सुपर 12 फेरीतून चार संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.  मात्र या मोठ्या स्पर्धेपूर्वी इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलनं क्रिकेट (ICC)  नियमात काही बदल केले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर नियम बदलण्यात आले आहेत. आयसीसीने कोणते नवे नियम लागू केले आहेत? जाणून घ्या

…तर नवा फलंदाज स्ट्राईकला येईल

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार झेल बाद झाल्यावरनवीन फलंदाजच फलंदाजी करेल. यापूर्वी जेव्हा एखादा फलंदाज झेल बाद झाला आणि नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रिज ओलांडले तर त्याला फलंदाजीची संधी मिळायची. आता स्ट्राईक बदलूनही नवीन बॅट्समन स्ट्राईक घेईल.

चेंडू पॉलिश करण्यावर बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने गेल्या दोन वर्षांपासून चेंडूवर थुंकी लावण्यावर बंदी घातली होती. आता हा नियम कायमस्वरुपी असणार आहे. म्हणजेच कोणताही गोलंदाज चेंडूवर थुंकू शकणार नाही. बॉल पॉलिश न करण्याचा नियम 2020 मध्ये लागू करण्यात आला होता.

फक्त 2 मिनिटांत तयार व्हावं लागणार

आता फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन मिनिटांत फलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. तर टी-20 फॉरमॅटमध्ये ही वेळ फक्त 90 सेकंद असेल. याआधी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ही वेळ 3 मिनिटांची असायची.

क्षेत्ररक्षकाची ही चूक पडणार महागात 

क्षेत्ररक्षणाच्या वेळी खेळाडूने जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीन मूव्हमेंट केल्यास दंड म्हणून फलंदाजाला पाच धावा दिल्या जातील.आधी या चेंडूला डेड बॉल म्हटले जायचे आणि फलंदाजाचा फटका रद्द केला जायचा.

मौका मौका! India Vs Pakistan पुन्हा सामना, या मॅचवर ठरणार T20 वर्ल्डकपचं भविष्य

फलंदाज खेळपट्टीवरूनच चेंडू मारू शकतात

बॉल खेळपट्टीपासून दूर पडला, तर फलंदाजाला आता खेळपट्टीवरूनच मारावा लागेल. जर फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर गेला तर अंपायर डेड बॉल घोषित करेल. दुसरीकडे फलंदाजाला खेळपट्टी सोडून शॉट खेळण्यास भाग पाडले तर नो बॉल दिला जाईल.

स्लो ओव्हर रेटचा नियम 

स्लो ओव्हर रेटचा नियम जानेवारी 2022 मध्ये T20 फॉरमॅटमध्ये लागू करण्यात आला होता. स्लो ओव्हर रेटसाठी संघांना दंड आकारण्यात आला होता. आता हा नियम वनडेमध्येही लागू होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *