Headlines

ICC Awards: उगवत्या ‘सूर्या’ला आयसीसीचा सलाम, ‘हा’ पुरस्कार पटकावणारा भारताचा पहिला खेळाडू

[ad_1]

ICC Award 2023: भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीने ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ची (T20 Cricketer of the Year 2022) घोषणा केली आहे. यंदाचा पुरस्काराचा मानकरी सूर्यकुमार यादव ठरला आहे. गेल्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा आयसीसीकडून (ICC) हा मोठा सन्मान करण्यात आला आहे. आयसीसी ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’च्या शर्यतीत सूर्यकुमार यादवबरोबर सॅम करन (Sam Curran), झिम्बाव्बेचा सिकंदर रजा (Sikandar Raza) आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) यांचा समावेश होता. पण सर्वांनावर सूर्यकुमार यादवने मात केली आहे. सूर्यकुमार यादव टी20 फॉर्मेटमध्ये अव्वल स्थानावर आहे. 

2022 मध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा
क्रिकेट जगतात 2022 हे वर्ष  खऱ्या अर्थाने सूर्यकुमार यादवचं होतं. या वर्षात खेळलेल्या 31 सामन्यांमध्ये सूर्याने तब्बल 1164 धावा केल्या. त्याचा स्ट्राईकरेट होता 187.43 इतका. इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा हा स्ट्राईकरेट खूप वरचढ आहे. एका वर्षात टी20 क्रिकेटमध्ये हजाराहून अधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय खेळाडू आहे. 

मैदानावर चौफेर फटकेबाजीमुळे सूर्याकुमारला Mr. 360 असं नाव पडलं आहे. 2022 या वर्षात सूर्याने टी20 क्रिकेटमध्ये तब्बल 68 षटकार लगावले. टी20 क्रिकेटच्या इतिहासत एका वर्षात इतके षटकार लगावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सूर्याने अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला आहे. 

सूर्यकुमार यादवचा आंतरराष्ट्रीय टी-20 रिकॉर्ड

45 सामने, 43 इनिंग
1578 धावा, 46.41 इकोनॉमी रेट
180.34 स्ट्राइक रेट, 3 शतकं
142 चौके, 92 षटकार

टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवची सर्वोत्तम धावसंख्या
इंग्लंड 2022 –  117 धावा
श्रीलंका 2023 – 112 धावा
न्यूझीलंड 2022 – नाबाद 111 धावा

हे ही वाचा : महिला IPL टीम्सची घोषणा! अदानी ग्रुपची आयपीएलमध्ये एन्ट्री.. BCCI झाली मालामाल

टी20 क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला
आयसीसीने दोन दिवसांपूर्वीच टी20 टीम ऑफ द इअरची घोषणा केली होती. यात भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश होता. भारताकडून सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या टीमचे खेळाडू होते. आयसीसी टी20 क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी आहेत. नुकतंच न्यूझीलंडला 3-0 अशी धुळ चारत भारत एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतही नंबर एक बनली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *