Headlines

कल्याणचा शिवसेना शहरप्रमुख मीच, पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही – आमदार विश्वनाथ भोईर | I am the Shiv Sena city chief of Kalyan there is no question of resigning MLA Vishwanath Bhoir msr 87

[ad_1]

“कल्याण शहराचा शिवसेना शहरप्रमुख म्हणून माझी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवड केली आहे. मी निष्ठावान शिवैसनिक आह. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो असलो, तरी आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे शहरप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. यासंदर्भात काही निर्णय घ्यायचा असतील तर पक्षप्रमुख तो घेतील.” अशी माहिती आज (शुक्रवार) कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.

गद्दार म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट करावी –

तसेच, “आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे यापुढील काळ शिवसैनिक म्हणून जी जबाबदारी आहे ती पार पाडणार आहे. आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आमच्यावर गद्दार म्हणून आरोप करण्यात आले. गद्दार म्हणजे काय याची व्याख्या पहिले असा शब्द वापऱणाऱ्यांनी स्पष्ट करावी.” असेही आमदार भोईर म्हणाले.

या दोन्ही पक्षांमधील मुरब्बी नेते शिवसेना संपवायला निघाले होते –

याचबरोबर “राष्ट्रवादी, काँग्रेसची सरकारमध्ये सर्वाधिक ढवळाढवळ होती. या दोन्ही पक्षांमधील मुरब्बी नेते शिवसेना संपवायला निघाले होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही आघाडी सरकारमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडलो आहोत. आम्ही कायम शिवसेनेत, शिवसेनेसोबतच राहणार आहोत. आम्ही वेगळा गट स्थापन केलेला नाही, असे गद्दार शब्द वापरणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे.” असेही आमदार भोईर म्हणाले.
आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर महिनाभरांनी आमदार भोईर यांनी प्रथमच आपली जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *