Headlines

मी रिटायर्ड आऊट होऊन….; ‘त्या’ निर्णयावर अखेर Ashwin चा खुलासा

[ad_1]

मुंबई : 10 एप्रिल रोजी झालेल्या लखनऊ विरुद्ध राजस्थान सामन्यात असं काही घडलं जे त्यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. राजस्थान रॉयल्सच्या 19 व्या ओव्हरमध्ये आऊट नसतानाही अश्विनने कोणाचीही परवानगी न घेता मैदान सोडलं. याला रिटायर्ड आऊट असं म्हटलं जातं. आयपीएलच्या इतिहासात याची पहिल्यांदाच नोंद झाली. दरम्यान यावर आता रविचंद्रन अश्विनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रिटायर्ड आऊट होण्यावर Ashwin ने सांगितली मोठी गोष्ट

रविचंद्रन अश्विनच्या मताप्रमाणे, रिटायर्ड आऊट होणं हे एक स्ट्रॅटेजिक पाऊल आहे. येणाऱ्या सामन्यांमध्ये तुम्ही खेळाडूंना रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेताना पाहणार आहात.

त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, टी-20 आता त्या पातळीवर जाऊ पोहोचलाय जिथे सध्या फुटबॉल खेळ आहे. फुटबॉलमध्ये ज्या पद्धतीने सबस्टिट्यू खेळाडूंचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे मी रिटायर्ड आऊट होऊन केलं. आपल्याला पहिल्यांदाच यामध्ये उशीर झाला आहे. मात्र येणाऱ्या सामन्यांमध्ये हा निर्णय घेतला जाताना तुम्ही पाहणार आहात.

रिटायर्ड आऊट झाल्यानंतर अश्विनला पुन्हा एकदा टीकेल सामोरं जावं लागलं. यावेळी अश्विन म्हणाला, आपण रिटायर्ड आऊटला एका चलाख खेळीप्रमाणे मानलं पाहिजे. आणि मला नाही वाटत की हे नॉन स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या खेळाडूला आऊट करण्याइतकं वाईट आहे.

‘कधी हे काम करू शकतं तर कधी नाही. फुटबॉलमध्ये या गोष्टी नेहमीच घडत असतात. यासाठी आपण अजूनही पूर्णपणे टी-20 क्रिकेटमध्ये प्रवेश केलेला नाही,’ असंही अश्विनने म्हटलं आहे.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडू ‘रिटायर्ड आऊट’

आर अश्विन IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच रिटायर्ड आऊट होणारा हा पहिला खेळाडू ठरला. जेव्हा फलंदाज कोणतीही दुखापत झाली नसताना अंपायच्या परवानगी शिवाय मैदान सोडतो तेव्हा त्याला रिटायर्ड आऊट म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये आर अश्विनला जर मैदानात परत जायचं असेल तर तो जाऊ शकत नाही. एकदा खेळाडूनं रिटायर्ड आऊट घेतलं की तो पुन्हा मैदानात फलंदाजीसाठी येऊ शकत नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *