Headlines

Hummm म्हणजे आलिया लग्नाआधीच गरोदर? रणबीरच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया समोर

[ad_1]

Alia Bhatt Pregnent : बॉलिवूडमधील प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडीची जोडी म्हणून गणल्या जाणाऱ्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीच्या नात्यात आनंदाची चाहूल लागली आहे. 14 एप्रिलला विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीनं लग्नाला दोन महिने उलटून गेल्यानंतर लगेचच बाळाच्या आगमनाची बातमी जाहीर केली. (family reaction on Bollywood Actress alia bhatt pregnent photo ranbir kapoor)

आलिया आणि रणबीरच्या वयातील अंतर आणि दोघांच्याही कारकिर्दीतील एकूण कामगिरी पाहता अनेकांच्या मते या जोडीचा हा निर्णय योग्यच. पण, काहींनी मात्र आलिया लग्नाआधीच गरोदर होती का? असा प्रश्नही विचारण्यास सुरुवात केली आहे. 

आलियाच्या गरोदरपणाची बातमी रणबीरच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडूनही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. रणबीरची बहिण रिद्धीमा कपूर साहनी हिनं आलियानं पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करत आनंद व्यक्त केला. 

इतकंच नव्हे, तर या गोड बातमीवर तितकीच गोड प्रतिक्रिया देत तिनं इन्साग्रामवर स्टोरीही शेअर केली. या स्टोरीमध्ये ‘माझ्या बाळांना बाळ होणारे…’ असं कॅप्शन लिहित तिनं आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर रणबीरच्या कुटुंबातून समोर आलेली ही पहिली प्रतिक्रिया ठरत आहे. 

तिथं आलियाला आपली लेक मानणाऱ्या निर्माता – दिग्दर्शक करण जोहर यानंही आपल्या लाडक्या जोडीला शुभेच्छा दिल्या. इन्स्टा स्टोरीमध्ये आलिया – रणबीरच्या लग्नातील एक फोटो शेअर करत त्यानं लिहिलं, ‘या दोघांसाठी खुप सारं प्रेम… माझ्या लेकिला बाळ होणार आहे’. तिथं रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत असणाऱ्या नीतू कपूर यांच्यापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा त्यासुद्धा काहीशा भावूक झाल्या. 

करण आणि रिद्धीमासह प्रियांका चोप्रा, बिपाशा बासू, इशान खट्टर, टायगर श्रॉफ या आणि अशा इतरही सेलिब्रिटींनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *