ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा | Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा | Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News
Categories: Breaking News

ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा

सांगली /प्रतिनिधि – ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन मार्फत जागतिक महिला दिन कवठे एकंद येथे गोसावी गल्ली मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तासगाव पोलीस ठाणे येथील समुपदेशक अधिकारी प्रमोद माने हे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली.

संस्थेच्या अध्यक्ष आरिफा मुजावर-शेख यांनी महिला दिनाचे महत्व व 2022 वर्षीची महिलादिनाची थीम स्त्री पुरुष समानता ही असून, या बद्दल मार्गदर्शन केले. स्त्री पुरुष समानता ही फक्त कागदावर असून चालणार नाही तर आपण आपल्या येणाऱ्या नव्या पिढीमध्ये स्त्री-पुरुष परस्पर पूरकता ही मूल्ये बालपणापासून रुजवणे गरजेचे आहे या बद्दल मार्गदर्शन केले,समुदेशक अधिकारी माने म्हणाले कि पिढ्यान पिढ्या उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या गोसावी समाजतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी जागृत होणे गरजेचे आहे तसेच त्यांनी महिला समुदेशन केंद्र व कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 याची माहिती महिलांना दिली.

आपण जरी भंगार गोळा करून आपली उपजीविका भागवत असलो तरी आपली येणारी पिढी यामध्ये येता काम नये, आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपण स्वतःच प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.ह्यूमन संस्था महिला व बालक विकसाठी वेगवेगळे प्रकल्प राबवत आहे मुला मुलींच्या मध्ये वयात येताना होणारे बदल व त्या बदलांना सामोरे कसे जावे तसेच महिलांचे हक्क व पर्यावरण या विषयावर संस्था काम करत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था सदस्य मुनेरा भालदार यांनी केले.आभार प्रदर्शन करिश्मा पवार यांनी केले ,कर्यक्रमाचे नियोजन बिस्मिल्ला सय्यद, पूजा पवार ,अंजली पवार,वनिता कोरे यांनी केले.

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Recent Posts

काय म्हणता आता एसटी स्थानके होणार हाय फाय

संग्रहित छायाचित्र टप्प्याटप्प्याने होणार बस स्थानकाचा समावेश मुंबई : एसटी आणि बस स्थानकांची दुरावस्था एसटी…

37 mins ago

Panchang, 09 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार…

Panchang, 09 December 2022: आजचा वार आहे शुक्रवार.  आजच्या पंचांगामध्ये तुम्ही शुभ आणि अशुभ काळ…

2 hours ago

Trends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा ‘हा’ खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!

Year in Search 2022: सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या सर्च इंजिने म्हणजेच गुगलने 2022 या (Google Trending…

10 hours ago

Horoscope 9 December : या राशीच्या व्यक्तींनी आज नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावं!

Horoscope 9 December : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि…

11 hours ago

बांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?

Mohammed Shami India vs Bangladesh Test Series: बांगलादेश दौऱ्यावर (Bangladesh) गेलेल्या टीम इंडियाला (Team India)…

11 hours ago

Fifa World Cup Quarter Finals Schedule : मेस्सी-रोनाल्डो ‘या’ दिवशी भिडणार? जाणून घ्या सेमी फायनलचे वेळापत्रक

Fifa World Cup Quarter Finals Schedule : कतारमध्ये सुरु असलेला फिफा वर्ल्ड कप (Fifa World…

11 hours ago