Headlines

ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा

सांगली /प्रतिनिधि – ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन मार्फत जागतिक महिला दिन कवठे एकंद येथे गोसावी गल्ली मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तासगाव पोलीस ठाणे येथील समुपदेशक अधिकारी प्रमोद माने हे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली.

संस्थेच्या अध्यक्ष आरिफा मुजावर-शेख यांनी महिला दिनाचे महत्व व 2022 वर्षीची महिलादिनाची थीम स्त्री पुरुष समानता ही असून, या बद्दल मार्गदर्शन केले. स्त्री पुरुष समानता ही फक्त कागदावर असून चालणार नाही तर आपण आपल्या येणाऱ्या नव्या पिढीमध्ये स्त्री-पुरुष परस्पर पूरकता ही मूल्ये बालपणापासून रुजवणे गरजेचे आहे या बद्दल मार्गदर्शन केले,समुदेशक अधिकारी माने म्हणाले कि पिढ्यान पिढ्या उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या गोसावी समाजतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी जागृत होणे गरजेचे आहे तसेच त्यांनी महिला समुदेशन केंद्र व कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 याची माहिती महिलांना दिली.

आपण जरी भंगार गोळा करून आपली उपजीविका भागवत असलो तरी आपली येणारी पिढी यामध्ये येता काम नये, आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपण स्वतःच प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.ह्यूमन संस्था महिला व बालक विकसाठी वेगवेगळे प्रकल्प राबवत आहे मुला मुलींच्या मध्ये वयात येताना होणारे बदल व त्या बदलांना सामोरे कसे जावे तसेच महिलांचे हक्क व पर्यावरण या विषयावर संस्था काम करत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था सदस्य मुनेरा भालदार यांनी केले.आभार प्रदर्शन करिश्मा पवार यांनी केले ,कर्यक्रमाचे नियोजन बिस्मिल्ला सय्यद, पूजा पवार ,अंजली पवार,वनिता कोरे यांनी केले.

Leave a Reply