Headlines

हृतिकच्या प्रेयसीला अशी वागणूक देतेय Ex Wife सुझॅन

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळं सर्वांच्या नजरा वळवताना दिसत आहे. गायिका आणि अभिनेत्री सबा आझाद हिच्यासोबत आधी हृतिकचं नाव जोडलं गेलं आणि त्यानंतर बॉलिवूडच्या या ग्रीक गॉडनंच त्याच्या आणि सबाच्या नात्याची ग्वाही दिली. (Hritik rishans ex wife Sussanne Khan girlfriend saba azads relationship)

निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या वाढदिवसाच्या पार्टीला सबा आणि हृतिकनं एकत्र हजेरी लावली. एकिकडे हृतिकच्या कुटुंबातही सध्या सबाची ये-जा वाढताना दिसत आहे. 

दुसरीकडे सुझॅन खान, अर्थात हृतिकच्या पहिल्या पत्नीशी असणारं तिचं नातंही जगासमोर आलं आहे. पतीपासून दूर झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या या महिलेला, अर्थात सबाला सुझॅन कशी वागणूक देईल हाच प्रश्न अनेकांना होता. 

पण, या सेलिब्रिटी मंडळींचा फंडाच वेगळा. जिथं सर्वसामान्य कोणत्याही गोष्टीला सहजासहजी विसरत नाहीत, तिथेच ही सेलिब्रिटी मंडळी मात्र भलत्याच उत्साहात काही गोष्टींचा मोठ्या मनानं स्वीकार करतात. 

एका सोशल मीडिया पोस्टमुळं याचीच प्रचिती आली. थोडक्यात सबा आणि सुझॅनचं नातं समोर आलं. सबानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडीओवर सुझॅननं कमेंट करत ‘Wow Sabooo.’ असं लिहिलं. 

या कमेंटला उत्तर देत सबानंही ‘Thanks my Soozloo.’ अशी कमेंट केली. या दोघींमध्ये सोशल मीडियावर झालेलं हे बोलणं पाहता त्यांचं नातं, चांगलंच मुरलंय असं म्हणायला हरकत नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *