Hrithik Roshan relationship status: 17 वर्षाहून छोट्या अभिनेत्रीच्या प्रेमात हृतिक रोशन ? इन्स्टाग्रामवर दिली कबूली


मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या एका नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. त्याच्याहून 17 वर्षाहून लहान अभिनेत्रीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघे पहिल्यांदाच डिनर डेटवर एकत्र दिसले होते. त्यानंतर  अलीकडेच सबा आझादने एका कमेंटसह हृतिक रोशनसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली आहे. त्यामुळे  दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील अशी आशा आहे. 

सबा आझादने इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली होती. ‘मिनिमम’ असे या चित्रपटाचे नाव होते. या तिच्या पोस्टवर हृतिक रोशनने ‘हा हा, तु छान दिसशील’ असे कमेंट केले होते.

या कमेंटवर सबा आझादने फिंगर क्रॉस असे म्हणतं माहित नाही असे सांगायचा प्रयत्न केला. तसचे माझे प्रेम असेही कमेंटच्या शेवटी लिहले. त्यामुळे सबाने त्याच्या प्रेमाला कबूली दिल्याचे यामध्ये चाहते बोलत आहेत. 
 
नवीन प्रोजेक्टची घोषणा करताना सबा आझाद यांनी लिहिले, “माझा पुढचा प्रोजेक्ट या रत्न लोकांसोबत आहे. आज आम्ही व्हरायटीचा एक भाग आहोत.

सबा आझाद, नमित दास, गीतांजली कुलकर्णी, रुमाना, आम्ही सर्वजण ‘मिनिमम’चा एक भाग असू. बेल्जियम-आधारित भारतीय नाटकावर, प्लॅटून वन फिल्म्स आणि इलनार फिल्म्स यांनी संयुक्तपणे त्याची निर्मिती केली आहे.

शिलादित्य बोरा आणि राधिका लावू यांनी देखील याची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे शूटिंग जून 2022 मध्ये सुरू होणार आहे. 

हृतिक रोशन आणि सबा आझाद या दोघांनीही त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही. चाहते फक्त आउटिंगवर दोघांना एकत्र पाहायचे. हातात हात घालून विमानतळावर स्पॉट्स करायचे. त्यावरून दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही अनेक गोष्टी सुरू आहेत, असा अंदाज प्रेक्षकांना आला होता.Source link

Leave a Reply