Headlines

फोन नंबर आणि IP Address च्या मदतीने लोकेशन ट्रॅक करणे शक्य ? कसे ? पाहा या ट्रिक्स

[ad_1]

नवी दिल्ली: How To track Location:जर तुम्हाला एखाद्याचे लोकेशन त्याच्या नकळत जाणून घ्यायचे असेल तर ते करण्याचे अनेक काही मार्ग आहेत. काही पद्धतींच्या मदतीने एखाद्याचे लोकेशन सहज ट्रॅक करता येते. पण, या पद्धती सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अनेकजण मोबाईल क्रमांकावरून इतरांचे लोकेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही पद्धत Google वर हा प्रश्न टाइप करण्याइतकी सोपी नाही. IP पत्ता आणि IMEI नंबर आणि फोन नंबर द्वारे ट्रॅक करण्याचे काही मार्ग नक्कीच आहेत. मोबाईल नंबर किंवा IP पत्त्याद्वारे लोकेशन कसे ट्रॅक केले जाते त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: काय आहे Har Ghar Tiranga अभियान ! कोणत्या वेबसाईटवर जावे लगेल? कुठे मिळेल सर्टिफिकेट? जाणून घ्या सर्वकाही

या पद्धती प्रत्येकासाठी नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या व्यक्तीचे स्थान IP पत्त्याद्वारे निश्चितपणे ट्रॅक करू शकता. यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची माहिती असावी लागते.पण, मोबाईल नंबरच्या मदतीने तुम्ही कोणाचे लोकेशन शोधू शकत नाही. किमान ते तुम्ही योग्य मार्गाने करू शकत नाही. यासाठी काही पद्धती आवश्यक आहेत. परंतु, सामान्य माणसाला त्या उपलब्ध होणे कठीण आहे.

वाचा: Internet Tips : Wi-Fi सेटअप योग्य असुनही इंटरनेट काम करत नसेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स

पोलीस ट्रॅकिंग कसे करतात ?

फोन नंबर ट्रॅक करण्यासाठी पोलीस नंबर किंवा IMEI नंबर वापरतात. यासाठी पोलीस टेलिकॉम कंपन्यांवर अवलंबून आहेत. फोन नंबर ट्रॅक करण्यासाठी पोलीस टेलिकॉम कंपनीची मदत घेतात. कंपनी पोलिसांना कळवते की, ट्रॅकिंगवर ठेवलेला नंबर कोणत्या सेल टॉवरजवळ सक्रिय आहे किंवा कोणत्याही सेल टॉवरपासून ट्रॅकिंगवरील नंबरचे अंतर किती आहे. त्याच्या मदतीने पोलिस गुन्हेगारांचे ठिकाण शोधतात.

आयपी अॅड्रेसच्या मदतीने लोकेशन शोधू शकता:

आयपी अॅड्रेसच्या मदतीने तुम्ही एखाद्याचे लोकेशन शोधू शकता. आयपी अॅड्रेस, म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल, हा अनन्य क्रमांकांचा संच असतो. प्रत्येक उपकरणाचा स्वतःचा IP पत्ता असतो. हा पत्ता चार संख्यांचा एक युनिक संच आहे. त्याच्या मदतीने तुम्ही एखाद्याचे लोकेशन जाणून घेऊ शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे त्या व्यक्तीचा IP पत्ता असणे आवश्यक आहे. पत्ता ट्रॅक करण्यासाठी, तुम्हाला आयपी लुकअप किंवा वोल्फ्राम अल्फा सारख्या साइटची मदत घ्यावी लागेल. या वेबसाइट्सना भेट दिल्यानंतर, तुम्हाला लोकेशन सर्चमध्ये आयपी अॅड्रेस टाकावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे संभाव्य लोकेशन मिळेल.

वाचा: Samsung Galaxy Z Flip 4, Galaxy Z Fold 4 चे प्री-बुकिंग ‘या’ दिवशी होणार सुरू, मिळतील भन्नाट ऑफर्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *