कसं खेळावं याचा कोहली घेतोय तेवतियाकडून टिप्स? ‘त्या’ फोटोनं विराट ट्रोल


मुंबई : आयपीएलमध्ये खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी खेळाडू सामना संपल्यानंतर गप्पा मारताना किंवा कधी एकमेकांसोबत वेगवेगळे क्षण अनुभवतानाचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

नुकताच चहलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता कोहली आणि तेवतियाचा एक फोटो चर्चात आला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली खुर्चीवर एक पाय दुमडून राजशाही थाटात बसला आहे. तर तेवतिया गुडघ्यावर बसल्याचं दिसत आहे. 

या फोटोवरून सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्सही तयार झाले. तर काही लोकांनी कोहलीला ट्रोलही केलं आहे. काही ट्रोलर्सनी याला जातीचा रंगही देण्याचा प्रयत्न केला. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो बंगळुरू विरुद्ध गुजरात सामन्याचा आहे. या सामन्यात राहुल तेवतियाला पुरस्कारही मिळाला. त्याला मॅन ऑफ द मॅच मिळालं. 

विराट कोहली तेवतियाशी बोलताना हा फोटो काढण्यात आला. या फोटोनंतर विराट कोहलीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं आहे. एक युजरने म्हटलं आहे की तेवतिया कोहलीला टिप्स देतोय त्याने टी 20 मॅच कशी खेळावी. दुसरा म्हणाला की दो यार बहुत टाइम बाद….Source link

Leave a Reply