[ad_1]
याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने ग्राहकांसाठी डिजिटल सिक्योरिटी गाइडलाइन जारी केली आहे. SBI ने ग्राहकांना डिजिटल ट्रांजॅक्शन, इलेट्रॉनिक पेमेंट आणि सोशल मीडिया सिक्योरिटीसाठी काय करायला हवे व काय नाही, याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने ग्राहकांना ५ टिप्स सांगितल्या आहेत, ज्या यूपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांनी लक्षात ठेवायला हव्यात. यामुळे आनलाइन फसवणुकीपासून वाचता येते. SBI ने दिलेल्या या टिप्स काय आहेत, ते पाहुयात.
ऑनलाइन फ्रॉडपासून वाचण्यासाठी फॉलो करा या टिप्स
- तुमचा मोबाइल पिन आणि यूपीआय पिन वेगवेगळा असावा
- यूपीआयशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करू नका.
- संशयास्पद मेसेज आणि कॉलबाबत नेहमी रिपोर्ट करा.
- लक्षात ठेवा की, पिनची गरज केवळ रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी असते, रिसिव्ह करण्यासाठी नाही.
- कोणतेही संशयास्पद ट्रांजॅक्शन झाल्यास, अकाउंटवर यूपीआय सर्विसला त्वरित डिसेबल करा.
दरम्यान, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस ही रियल-टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) डेव्हलप केली आहे. हे वेगवेगळ्या बँकिंग सेवांना कोणत्याही समस्येशिवाय एकाच मोबाइल अॅपवर उपलब्ध करते. याद्वारे पीयर टू पीयर कलेक्शन रिक्वेस्ट देखील स्विकारते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार सहज पेमेंट करू शकता. यूपीआयद्वारे पेमेंट करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही शेअर करू नये. यूपीआय पिन शेअर करू नये. तसेच, कोणत्याही अनोळखी मेसेज व लिंकवर क्लिक करू नये.
वाचा: ६ हजारांच्या बजेटमध्ये आला Nokia चा दमदार स्मार्टफोन, १३ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह मिळेल शानदार फीचर्स
वाचा: अवघ्या १० मिनिटात चार्ज होणारा OnePlus चा भन्नाट स्मार्टफोन भारतात लाँच, मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा किंमत
वाचा: Elon Musk ने पराग अग्रवाल यांना कंपनीतून काढले? यूजर्सला उत्तर देत ट्विटर सीईओ म्हणाले…
वाचा: फक्त ३० हजारात मिळतोय iPhone, Flipkart वरून करू शकता खरेदी; पाहा ऑफर्स
[ad_2]