Headlines

महागडा स्मार्टफोनही पाण्यात होऊ शकतो खराब, Phone Waterproof आहे की नाही ‘असे’ करा चेक


नवी दिल्ली: Waterproof Smartphones : आजकाल स्मार्टफोन न वापरणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आता स्मार्टफोन केवळ कॉलिंगपुरतेच मर्यादित नसून अनेक महत्वाच्या कामांसाठी वापरले जातात. स्मार्टफोनमध्ये इतका डेटा असतो की चुकूनही तो खराब झाला तर मोठ्या अडचणी येऊ शकतात. पाणी पडले, पाऊस आला की फोन ओला होऊन खराब होऊ शकतो. अशात स्मार्टफोन वॉटरप्रूफ असणे आवश्यक आहे. तुमचा फोन वॉटरप्रूफ आहे की नाही हे तुम्ही सहज तपासू शकता. कोणते आयपी रेटिंग फोनला पाण्यापासून सुरक्षित ठेवू शकते हे जाणून घ्या.

वाचा: Flipkart वर पुन्हा जबरदस्त डील, आता ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त मिळतोय iPhone 13

पावसात स्मार्टफोन खराब होऊ शकतो!

स्मार्टफोनला पाण्यापासून दूर ठेवण्यासाठी फोन वॉटरप्रूफ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात, जवळजवळ प्रत्येक फोन वॉटरप्रूफ असल्याचा दावा करतात. परंतु, ते माहित करण्यासाठी अनेक रेटिंग आहेत. ज्याचा अर्थ देखील भिन्न आहे. फोनमधील रेटिंग काय आहेत, कोणते IP रेटिंग सर्वात चांगले आहे, कोणते रेटिंग तुमचा फोन पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकते ते पाहा.

वाचा: BSNL चे पैसा वसुल प्लान्स ! रोज २ GB डेटा, गेम्स आणि OTT सह ९० दिवसांची व्हॅलिडिटी,सोबत ‘हे’ बेनेफिट्स

फोन वॉटरप्रूफ आहे की नाही हे जाणून घ्या:

स्मार्टफोन वॉटरप्रूफ असल्याचे सांगण्यासाठी एक रेटिंग वापरली जाते, ज्याला IP (Ingress Protection) रेटिंग असे नाव आहे . IP रेटिंग एक ते सहा पर्यंत असते, रेटिंग जितके जास्त असेल तितका तुमचा फोन पाण्यापासून अधिक सुरक्षित असेल. जर तुमच्या फोनला IPXX रेटिंग मिळालेली असेल तर तुमचा फोन वॉटरप्रूफ नाही. तर, IPX8 रेटिंग असलेले फोन वॉटरप्रूफ असतात पण डस्टप्रूफ नाहीत.

हे आयपी रेटिंग असलेले फोन सर्वोत्तम आहेत

हे सर्वोत्तम वॉटरप्रूफ रेटिंग आहे आणि पावसाळ्यात फोनला पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकतात . जर तुमचा फोन IP68 रेटिंगने सुसज्ज असेल तर तो वॉटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ आहे, म्हणजेच फोन किमान ३० मिनिटे एक मीटर खोल पाण्यात सुरक्षित राहू शकतो.

वाचा: Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar मिळणार अगदी मोफत, भरावा लागेल ‘हा’ फॉर्म

Source link

Leave a Reply