How much funding will Maharashtra get Chief Minister eknath shinde clear after the Niti Aayog meetingपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या बैठकीला हजरी लावली होती. या बैठकीत महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीबाबत चर्चा झाली असून राज्याला भरघोस निधी मिळणार असल्याचा खुलासा शिंदेनी केला आहे.

हेही वाचा- तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचा निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार

बैठकीच्या फोटोत एकनाथ शिंदेंना शेवटच्या रांगेतील स्थान

नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीति आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन आता विरोध पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.

हेही वाचा- केंद्राने राज्यांवर धोरणे लादू नयेत! ;  निती आयोगाच्या बैठकीत बिगरभाजप मुख्यमंत्र्यांची भूमिका

फोटोवरून रोहित पवारांचा आक्षेप

नीति आयोगाच्या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे हा मराठीजनांचा अपमान आहे. “एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झाले आहे. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घ्यावी”, असे ट्वीट रोहीत पवार यांनी केले आहे.Source link

Leave a Reply