Headlines

Horoscope Today 10 June 2022: आज कोणाच्या वाट्याला प्रवासयोग, कोण होणार लखपती? पाहा

[ad_1]

Horoscope Today 10 June 2022: आजचा दिवस अनेक कार्यालयीन मंडळींसाठी आठवड्याची अखेर. चला तर मग पाहूया कसा असेल तुमचा आजचा दिवस 

मेष – अडकलेली सर्व कामं आज मार्गी लागणार आहेत. आजचा दिवस शुभ आहे. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. जुन्या मित्रांना भेटाल. 

वृषभ- नोकरीच्या ठिकाणी गोष्टी तुमच्या मनाजोग्या घडतील. जास्त उष्ण वातावरणात घराबाहेर पडू नका. कुटुंबाला वेळ द्या. 

मिथुन- आज दणदणीत पगाराच्या नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे. एखादी शुभवार्ता कळेल. काहीसा थकवा जाणवू शकतो. 

कर्क- आज नोकरीच्या ठिकाणी अडकलेली पदोन्नती मिळणार आहे. पगारवाढीने आनंद गगनात मावेनासा होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह- एखाद्या धार्मिक कामात सहभागी व्हाल. प्रवासाच्या निमित्ताने कुटुंबीयांची भेट होईल. दिवस आनंददायी आहे. 

कन्या- कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या बाळगू नका. मनातल्या भावना एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोला. मुलाबाळांची काळजी घ्या. 

तुळ- आज एखाद्या नव्या कामाची सुरुवात कराल. वरिष्ठांचे सल्ले ऐका फायदा होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. जोडीदाराच्या साथीनं प्रगती कराल. 

वृश्चिक- आज एखादी शुभवार्ता कळेल. मित्रांना भेटा, त्यांच्याशी हा आनंद बोला. आज नियती तुमच्यासाठीच सर्वकाही रचत आहे असं भासेल. 

धनु- एखाद्या महत्त्वाच्या कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळणार आहे. आज तुमच्या यशानं सगळे प्रभावित होणार आहेत. 

मकर- सहकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे आज तुमची प्रगती होणार आहे. कृतज्ञ राहा. वरिष्ठांच्या अपेक्षा आज तुमच्याकडून पूर्ण होणार आहेत. 

कुंभ- आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यात असणाऱ्या महिलाच तुमची मदत करणार आहेत. प्रवासयोग आहे. आज धनलाभ होणार आहे, मोठा फायदा दिसतोय. 

मीन- विचलित होऊ नका, एकाग्र राहण्याचा प्रयत्न करा. मोठ्या व्यक्तींमध्ये वावरण्याची संधी मिळेल. इतरांवर तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *