Headlines

Horoscope 29 June : आज तुम्हाला मिळणार भाग्याची साथ; जाणून घ्या कसा असेल दिवस

[ad_1]

Horoscope 28 June : दिवसाची सुरुवात करताय? आधी पाहा आजचं राशीभविष्य 

मेष-  सामाजिक कार्यांमध्ये आज तुमचा सहभाग असेल. आर्थिक कामांना वेग मिळेल. इतरांशी साधलेला संवाद यशस्वी ठरेल. 

वृषभ- एखादी मौल्यवान भेट मिळणार आहे. नव्या नोकरीची संधी मिळणार आहे. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटेवर जाण्याची संधी आहे. 

मिथुन- अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. प्रशासनाची साथ असल्यामुळं तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे. जवळच्या व्यक्तींशी असणारं नातं आणखी दृढ होईल. 

कर्क- एखादी महत्त्वाची बातमी कळेल. धनलाभाचा योग आहे. विवाहप्रस्ताव येणार आहेत. यातूनच कोणा एका व्यक्तीला तुमची पसंती मिळेल. 

सिंह- सध्याची वेळ तुमच्या फायद्याची आहे. आर्थिक कामं प्रगतीपथावर असतील. धनाढ्य होण्याची संधी आहे. वरिष्ठांची तुमच्यावर कृपा असेल. 

कन्या – करिअर आणि नोकरीमध्ये नव्या आणि तितक्याच फायद्याच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. एखादा प्रवासयोग आहे. नोकरीच्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे. 

तुळ- नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांची मोलाची मदत होणार आहे. आज अशी शुभवार्ता कळेल जी आयुष्य बदलणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लावा. 

वृश्चिक – अनपेक्षित फायदा मिळण्याची संधी आहे. नित्यनियमानं करता ती कामं सुरुच ठेवा. दिवस शुभ आहे. 

धनु- निर्धारित लक्ष्य गाठण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. जवळच्या व्यक्तींशी असणारं तुमचं नातं दृढ होणार आहे. इतरांचा विश्वास जिंकाल. 

मकर- दैनंदिन कामांमध्येच एखादी आनंदाची बातमी मिळेल. शुभवार्ता कळणार आहे. व्यवहार चातुर्य कायम ठेवा. 

कुंभ- स्वत:वर विश्वास ठेवा. आत्मविश्वास बळावेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी आहे. कामात काटेकोरपणा ठेवा. 

मीन- नाती आणि घट्ट होतील. वादांपासून दूर राहा. दिवस शांत आणि तितकाच सकारात्मक असेल. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *