Horoscope 24 January 2023: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? धनलाभ होणार की नोकरीत यश? पाहा तुमच्या राशीचं आजचं भविष्य


Horoscope 24 January 2023 : दिवसाच्या सुरुवातीलाच जाणून घ्या कसं असेल आजचं तुमचं दैनंदिन राशीभविष्य

मेष- नोकरी बदलण्याचा विचार किंवा त्यासंदर्भातील काम आज टाळावं. जुन्या अडचणींमधून आज सुटका होण्याची चिन्हं आहेत. मोकळ्या वेळेचा योग्य वापर करा. लाल रंगाची फळं दान म्हणून देऊ शकता.
शुभ रंग – पिवळा

वृषभ- नातेवाईकांशी कारण नसताना वाद घालू नका. डोकेदुखीचा त्रास असेल तर आज आराम मिळण्याची शक्यता आहे. आपलं काम स्वत: करा आज इतरांवर कामासाठी अवलंबून राहू नका. तांदूळ दान म्हणून देणं फायद्याचं ठरेल.
शुभ रंग – निळा

मिथुन- संध्याकाळपर्यंत धावपळ वाढण्याची शक्यता. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. धीर आणि शांतता कायम ठेवा. तूप दान म्हणून देऊ शकता.
शुभ रंग – चॉकलेटी

कर्क- वैवाहिक जिवनामधील वाद संपवण्यासाठी उत्तम दिवस. नोकरीच्या ठिकाणी असलेल्या अडचणी संपतील. वडिलांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या.
शुभ रंग – पिवळा

सिंह – व्यापारामधील तणावापासून मुक्ती मिळेल. तुमच्या मुलांना यश प्राप्त होईल. आपल्याहून वयस्कर व्यक्तींचा सन्मान करा. घरी पाहुणे येण्याची शक्यता.
शुभ रंग – सोनेरी

कन्या – विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं. उधारी म्हणून दिलेले पैसे परत मिळतील. मित्रांबरोबर वेळ घालवण्याची संधी. गरम, उबदार कपडे दान करु शकता.
शुभ रंग –  तपकिरी

तूळ- स्थान परिवर्तन जपून करा. नात्यांसंदर्भात बेजबाबदारपणे वागू नका. आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. गूळ दान करु शकता.
शुभ रंग – गुलाबी

वृश्चिक – जोडीदाराचा मान राखा. व्यापारासंदर्भातील नियोजित दौरा रद्द होण्याची शक्यता. भाग्यावर विश्वास टेवा. उगवत्या सुर्याचं दर्शन घ्या.
शुभ रंग – लाल

धनु- मित्रांबरोबर भटकंती टाळा. वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. गरजुंची मदत करा. पिवळ्या रंगाची फळं दान करु शकता.
शुभ रंग – गाजरी

मकर – नोकरीमध्ये यश मिळण्याची शक्यता. आर्थिक फायदा होणार. नात्यामध्ये गोडवा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्न आणि वस्त्र दान म्हणून देऊ शकता.
शुभ रंग – पांढरा

कुंभ – मोठा नियोजित प्रवास टाळा. घरी बनवलेल्या पदार्थांचेच सेवन करा. आपल्या लोकांबरोबर राहा. सरस्वतीची उपासना करा. 
शुभ रंग – पांढरा

मीन – नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती सुधारण्याची शक्यता. कोणाशीही वाद घालू नका. आपल्या गुरुंचा सन्मान करा. पिवळ्या रंगाची मिठाई दान करु शकता.
शुभ रंग – सोनेरी

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि समजुतींच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)Source link

Leave a Reply