Headlines

घर घ्यायचंय; पण डाऊनपेमेंटची चणचण भासतेय? अशी करा तयारी लगेच होईल काम

[ad_1]

नवी दिल्ली : आपल्या स्वप्नातील घर बांधणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हे साध्य करण्यासाठी लोक आयुष्यभर कष्ट करतात. घर खरेदी करणे हा जीवनातील एक महत्त्वाचा आर्थिक निर्णय आहे. यामध्ये लोकांच्या ठेवी गुंतवल्या जातात.

आजच्या काळात घराचे स्वप्न पूर्ण करण्यात बँकांच्या गृहकर्ज योजनांचा मोठा वाटा आहे. होम लोनद्वारे तुम्ही तुमचे घर सहज खरेदी करू शकता. तुम्ही गृहकर्जाची योजना आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुम्हाला गृहकर्जाशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

5% ते 20% डाउन पेमेंटची गरज

कंपन्या घर खरेदीच्या संपूर्ण खर्चाच्या 100% कर्ज देत नाहीत. साधारणपणे, तुम्ही विक्री करार मूल्याच्या 80% पर्यंत कर्ज मिळवू शकता. तुम्हाला उरलेल्या पैशाची व्यवस्था डाऊन पेमेंटच्या रूपात करावी लागते.

साधारणपणे मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या सुमारे 5% ते 20% डाउन पेमेंट आवश्यक असते आणि इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे अनेकांसाठी थोडे कठीण असते. जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर डाउन पेमेंट आणि इतर खर्चासाठी पैशांची व्यवस्था करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

अल्प मुदतीची गुंतवणूक कामी येऊ शकते

अनेकांना घर घेण्यासाठी डाउन पेमेंट जमा करण्यासाठी अडचण येऊ शकते. पण जर तुम्ही महागडी प्रॉपर्टी घेणार असाल तर डाऊन पेमेंटही जास्त होते. अल्पकालीन गुंतवणूक उपयुक्त ठरते. याशिवाय, इक्विटी सारखी गुंतवणूक देखील उपयुक्त ठरू शकते, कारण या गुंतवणुकीतून कधीही पैसे काढले जाऊ शकतात.
तुमच्या खर्चावर अगोदरच अंकुश ठेवा अन् काही पैशांची बचत करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि नियमित बचत करा

अनसिक्यॉर्ड कर्ज घेण्याचा प्रयत्न करा

तुमचा जमा खर्चाचा विचार करून अनसिक्यॉर्ड कर्ज घेण्याचा देखील विचार करू शकता. अनसिक्यॉर्ड कर्जासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नसते, परंतु व्याजदर थोडा जास्त असतो.
परंतु तुम्ही तुमच्या परतफेडीच्या क्षमतेचे मूल्यांकन केल्यानंतरच अनसिक्यॉर्ड कर्ज घ्यावे. असा सल्ला तज्ज्ञ देतात.

तुम्ही विमा आणि पीएफवर कर्ज घेऊ शकता

तुम्ही तुमच्या जीवन विमा पॉलिसी किंवा भविष्य निर्वाह निधी (PF) वर देखील कर्ज घेऊ शकता. यावर कर्ज सहज उपलब्ध आहे आणि व्याज खूप कमी लागते. त्यामुळे डाउन पेमेंटचा भार कमी होईल.

जास्तीत जास्त डाउन पेमेंट करण्याचे अनेक फायदे आहेत. याद्वारे तुम्ही बँकेसोबत व्याजदराची बोलणी करू शकता. डाउन पेमेंट जितके जास्त असेल तितकी कर्जाची रक्कम कमी असेल. तुम्हाला कमी रकमेवर व्याज द्यावे लागेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *