Headlines

Home Loan घेण्याआधी या विशेष गोष्टींकडे लक्ष द्या; नाहीतर होईल अडचण

[ad_1]

 

मुंबई  : प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, आपल्या स्वप्नांचं घर असावं. त्या घरात आपल्या आयुष्याचा संपूर्ण आनंद सामावलेला असावा. परंतू यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याची गरज पडते. होम लोनचे व्याज दर सध्या 6.65 % पासून सुरू होत आहेत. अनेकदा आपल्याला होमलोनचे व्याज कमी वाटते. परंतू ते भरता भरता नाकी नऊ येतात.

किती रक्कमेची गरज

होम लोनला अप्लाय करण्याआधी समजून घ्या की तुम्हाला किती रक्कमेची गरज आहे. हे तुम्ही तोपर्यंत ठऱवू शकत नाही, जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर्टीबाबत अचूक माहिती नसते. कोणत्याही माहितीशिवाय तुम्ही अधिक होमलोन घेतल्यास त्याचा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. यासाठी तुम्ही बँक कर्मचाऱ्यांना सल्ला देऊ शकता. 

सुरक्षित नोकरी

होमलोन घेतल्यानंतर त्याची पुनर्फेड करणे मोठे आव्हान असते. होम लोन वेळेत भरता येण्यासाठी तुमच्याकडे सुरक्षित नोकरी असणे गरजेचे आहे. होमलोन भरण्यासाठी लोकांना 15-20 वर्षे लागतात. अनेक लोकं वेळेवर लोनची रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे त्याचे व्याज वाढतच जाते. 

EMI डिफॉल्टर होऊ नये

जर तुम्ही कोणत्याही कारणामुळे पर्सनल लोन, कार लोन किंवा अन्य लोन घेत असाल तर तर त्याचा हफ्ता(EMI)न भरता आल्यास, हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. अनेक लोकांची कोरोना काळात नोकरी गेली आहे. जर तुम्हाला घर घेणे अत्यावश्यक वाटत असेल तर, इतर कोणतेही लोन संपवल्यानंतरच लोन घ्या.

कंटिजंसी फंड

जर तुम्ही होम लोनची प्लॅनिंग करीत असाल तर, त्यासाठी कंटिजंसी फंड अत्यावश्यक आहे. हा एक एमरजन्सी फंड असतो. कोणत्याही कारणामुळे तुम्ही आर्थिक चणचणीत अलात तर अशावेळी या फंडमधून तुम्ही EMI भरू शकता. 

जोडीने घेऊ शकता लोन

जर तुम्ही तुमच्या पत्नीला होमलोनमध्ये को-एप्लीकंट बनवले तर, होमलोनचे व्याजदर कमी होऊ शकतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *