Headlines

“हॉलिवूडच्या चित्रपटाला अर्थ आहे, पण…”; Laal Singh Chaddha वर भडकला इंग्लडचा खेळाडू

[ad_1]

Laal Singh Chaddha : आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor) यांचा लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच तो वादात सापडला आहे. चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सोशल मीडियावर ट्रेंण्डही चालवण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकांनी हा चित्रपट पाहाणार नसल्याचे म्हटले आहे.

‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्यानंतर आमिर खानने याबाबत मौन सोडलं होतं. “कोणत्याही गोष्टीवरुन मी कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याचं मला दुःख आहे. मला कोणालाही दुखवायचं नाही. जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर मी त्यांच्या भावनांचा आदर करतो,” असे आमिरने म्हटले आहे.

इंग्लडच्या माजी क्रिकेटपटूनेही या चित्रपटाबाबत भाष्य करत टीका केली आहे. या चित्रपटामुळे हा खेळाडू भडकला आहे. याबाबत खेळाडून ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इंग्लडच्या माजी क्रिकेटपटू माँटी पानेसारने (monty panesar) ट्विटद्वारे आपला राग व्यक्त केला आहे. माँटी पानेसारनुसार हा चित्रपटाद्वारे भारतीय सैन्य (Indian army) आणि शिखांचा अपमान करण्यात आला आहे.

लाल सिंग चड्ढा १९९४ मध्ये आलेल्या फॉरेस्ट गम्प या हॉलिवूडपटाचा रिमेक आहे. ज्यामध्ये कमी बुध्यांक असलेली एक व्यक्ती अमेरिकन सैन्यात सामील होतो. पानेसारने म्हटले आहे की, हॉलिवूडच्या चित्रपटाला अर्थ आहे कारण अमेरिका व्हिएतनाम युद्धासाठी कमी बुध्यांक असलेल्या व्यक्तींना सैन्यात भरती करत होती. माँटी पानेसारने या चित्रपटावरील राग ट्विटरवर काढला आहे.

या चित्रपटाद्वारे भारतीय सैन्याचा आणि शिखांचा अपमान करण्यात आला आहे, असेही पानेसारने म्हटले आहे. तसेच ट्विटसोबत #BoycottLalSinghChadda चाही वापर केला आहे.

माँटी पानेसारचे आई वडील भारतीय आहेत. माँटी पानेसारने इंग्लडकडून ५० कसोटी, २६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान, दोन्ही फॉरमॅटमध्ये त्यांने अनुक्रमे १६७ आणि २४ बळी घेतले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *