AgriculturebarshiBreaking News

रयत क्रांती संघटनेच्या वतीने शासन निर्णयाची होळी

बार्शी/प्रतिनिधि – राज्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यासाठी मा. मुख्यमंत्री भरीव मदत देणार असं वारंवार बोलतं होते पण 6/10/2 1च्या जी आर शासनाने अतिवृष्टी ग्रस्थांची क्रूर चेष्टा करत अल्प मदत जाहीर केली. त्या शासन निर्णयाची आज तहसील कार्यालय या ठिकाणी रयत क्रांती संघटना बार्शी च्या वतीने होळी करण्यात आली.

तसेच दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी केंद्र सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमीट लावण्यासंबंधी जी आर कडून राज्य सरकारला अधिकार दिलेला आहे. राज्य सरकारने सोयाबीन व खाद्यतेलावर स्टॉक लिमिट लावू नये. ते रयत क्रांती संघटनेला मान्य नाही. यामुळे ऐन हंगामात सोयाबीनचे दर पडणार आहेत. राज्य शासनाला हा स्टॉक लिमीटचा केंद्राचा जी आर लागून करण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारने तो अधिकार वापरून सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यावा. दोन्ही जी आर शेतकऱ्यांना अन्याकारक आहेत त्यामुळं रयत क्रांती संघटना बार्शी च्या वतीने होळी करण्यात आली तरी सुधारित जी आर काढण्यात यावा.यावेळी कृष्णा काशिद, पांडुरंग काळे, नितीन कदम, पांडुरंग घोलप, संदीप बोटे, भास्कर हजारे, हनुमंत पाटिल, रामचंद्र गोसावी, भागवत हजारे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!