होळी खेळताना रंग जावून खराब होऊ शकतो तुमचा स्मार्टफोन, ‘या’ टिप्सने मिनिटात करा साफ


नवी दिल्ली : हिंदू धर्माच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला होळी (Holi 2022) हा सण आज साजरा केला जात आहे. होळी पाठोपाठच धुलिवंदनाचा उत्साह देखील लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. लहान मुलं, वयोवृद्ध एकत्र जमून या सणांचा आनंद घेत असतात. याशिवाय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक इत्यादी एकत्र येऊन रंगांची मनसोक्त उधळण देखील करतात. मात्र, होळीला रंग खेळताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. होळी खेळताना प्रामुख्याने इलेक्ट्रिक गॅजेट्सची काळजी घेणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने स्मार्टफोन सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. होळी खेळताना रंग अथवा पाणी गेल्यास स्मार्टफोन खराब होऊ शकतो व यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होईल. हे रंग लागून फोन खराब होऊ शकतो. मात्र, रंग लागून तुमचा फोन खराब झाला तरी काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही सहज सोप्या टिप्सने हा रंग काढू शकता व यामुळे स्मार्टफोनचे नुकसान देखील होणार नाही.

अल्कोहल असणाऱ्या क्लिनरचा करा वापर

होळी खेळताना अथवा रंगांची उधळण करताना कितीही काळजी घेतली तरीही स्मार्टफोनला रंग लागतोच. अशा स्थितीमध्ये तुम्ही जर कव्हर अथवा वॉटरप्रुफ पाउचचा वापर करत नसाल तर तुमचा फोन खराब होऊ शकतो. जर तुमचा स्मार्टफोन पुन्हा नवीन दिसावा असे वाटत असल्यास तुम्ही अल्कोहल असलेल्या क्लिनरचा वापर करू शकता. याद्वारे तुमच्या फोनला लागलेला रंग सहज निघून जाईल व हँडसेट पुन्हा पहिल्यासारखा चमकू लागेल. स्मार्टफोनवर असलेल्या बॅक्टेरिया आणि व्हायरसला देखील नष्ट करतो. त्यामुळे अल्होकल असणाऱ्या क्लिनरचा वापर केल्यास फोनवरील रंग निघून जाईल.

वेट वाइप्स

बाजारात अल्होहल असलेले वेट वाइप्स उपलब्ध असून, याची किंमत खूपच कमी आहे. तुम्ही याचा वापर करून स्मार्टफोनला साफ करू शकता व यामुळे हँडसेट पुन्हा चमकू लागेल. याचा वापर प्रामुख्याने धूळ-माती साफ करण्यासाठी केला जातो. मात्र, तुम्ही स्मार्टफोनवर लागलेले रंग देखील साफ करू शकता. यामुळे फोनला लागलेले रंग सहज निघून जातील. तसेच, फोनला सुका रंग लागला असल्यास तुम्ही मऊ कापडाचा वापर करून देखील हा रंग हटवू शकता. दरम्यान, तुम्ही होळी अथवा धुळवड साजरी करत असाल तर फोनची विशेष काळजी घ्या. यासाठी तुम्ही वॉटरप्रुफ पाउचचा वापर करू शकता.

वाचा: एकाच रिचार्जमध्ये कुटुंबातील तिघांना मिळणार फायदे, ‘या’ प्लानमध्ये १६०GB डेटा-कॉलिंग-ओटीटी बेनिफिट्स फ्री

वाचा: आता मिळणार ‘मेड इन इंडिया’ iPhone 13, भारतातील ‘या’ ठिकाणी होणार फोनचे उत्पादन

वाचा: ‘या’ पंख्याला चक्क गळ्यात अडकवून फिरता येईल, गर्मीपासून होईल सुटका; किंमत फक्त ४०० रुपये

वाचा: Google Pay, Phonepe ची मक्तेदारी मोडीत निघणार, Tata Group डिजिटल पेमेंट अ‍ॅप लाँच करण्याची शक्यता

Source link

Leave a Reply