Headlines

वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती

[ad_1]

मुंबई : आयर्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू केविन ओब्रायनने (Kevin O’Brien) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. केविनने त्याच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करून याबाबतची घोषणा केली. या त्याच्या घोषणेनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केविनच्या (Kevin O’Brien Retires) नावावर फास्टेट सेंच्यूरीचा रेकॉर्ड आहे, यासह अनेक विशेष कामगिरी त्याच्या नावावर आहे ती जाणून घेऊयात.  

ट्विट करून काय म्हणाला? 
ओब्रायनने (Kevin O’Brien) निवृत्तीची घोषणा करताना लिहिले की, 16 वर्षांनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. तो म्हणाला की,ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धेत मला माझी कारकीर्द संपवण्याची आशा होती, परंतु गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर माझी आयर्लंडच्या टी-20 संघात निवड झाली नाही. ओब्रायनने पुढे लिहिले की,मला जाणवले की निवडकर्ते आणि व्यवस्थापन काहीतरी वेगळे पाहत आहेत. आयर्लंडकडून खेळताना मी प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटला.तसेच केविनने त्याचे प्रशिक्षक,कुटुंब, पत्नी आणि आयरिश चाहत्यांचे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अतुलनीय पाठबळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.

विशेष रेकॉर्ड 
केविन ओब्रायनने (Kevin O’Brien Retires) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 38 वर्षीय केविन हा आयरिश क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. त्याने 16 वर्षांच्या कारकिर्दीत आयर्लंडसाठी 266 सामन्यांमध्ये दिसला. आयर्लंडला T20 विश्वचषक 2021 मधील शेवटच्या सामन्यात नामिबियाविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. योगायोगाने तो सामना केविनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

फास्टेट सेच्यूरी 
केविन ओब्रायनच्या (Kevin O’Brien) नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके आहेत, त्यापैकी एक संस्मरणीय आहे. 2011 च्या विश्वचषकात केविन ओब्रायनने केवळ 63 चेंडूत 113 धावा करून इंग्लंडविरुद्ध तीन विकेट्सने विजय मिळवून दिला होता. या दरम्यान केविन ओब्रायनने (Kevin O’Brien Retires)  अवघ्या 50 चेंडूत शतक झळकावले, जे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक आहे. 

सामन्यातला ‘तो’ किस्सा
हा किस्सा 2011 वर्ल्डकप दरम्यानचा आहे. इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये हा सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडने आयर्लंड समोर 328 धावांचा डोंगर ठेवला होता. या धावांचा पाठलाग करून जिंकणे अशक्यच वाटत होतं. आयर्लंडचे एका मागो माग एक विकेट पडत होते. 111 धावांवर 5 विकेट इतकी बिकट अवस्था असताना केविन ओब्रायन (Kevin O’Brien Retires) मैदानात उतरला होता. यावेळी केविनने त्यांच्या आयुष्यातील सर्वांत उत्कृष्ट खेळी केली. त्याने याचं सामन्यात फास्टेट सेंच्यूरी मारण्याचा विक्रम केला. त्याने 50 बॉलमध्ये शतक ठोकलं आयर्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. हा सामना आयर्लंडने 3 विकेटस राखत जिंकला होता. 

कारकिर्द 
केविन ओब्रायनच्या (Kevin O’Brien Retires)  नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3619 धावांव्यतिरिक्त 114 विकेट्सची नोंद आहे. कसोटीत शतक झळकावणारा तो आयर्लंडचा एकमेव फलंदाज आहे. केविन ओब्रायन हा आयर्लंडसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1973 धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 2019 मध्ये, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केविनच्या बॅटमधून 729 धावा केल्या होत्या.  

दरम्यान केविन ओब्रायनची (Kevin O’Brien) ती खेळी आजही अनेक क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. त्याने पुन्हा एकदा अशाप्रकारची खेळ करावा अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा होती.मात्र त्याने निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांची निऱाशा झालीय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *