Headlines

हीच खरी टीम इंडिया…! रडत बसलेल्या Rohit Sharma ला ‘या’ व्यक्तीने दिला धीर

[ad_1]

IND vs ENG Semi-Final : आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी फार वाईट दिवस आहे. टी-20 वर्ल्डकपमधून (T20 world cup) टीम इंडिया बाहेर पडली आहे. एडिलेडमध्ये झालेल्या इंग्लंड विरूद्ध भारत (INDvsENG) या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने (England) 10 विकेट्सने भारताचा पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रोहितला (Rohit Sharma) अश्रू अनावर झाल्यावर दिसतंय. 

सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला. रडू आवरणं रोहितला शक्य नव्हतं. यावेळी त्याचे पाणावलेले डोळे कॅमेरातही कैद झालेत. रोहित एकटात बसून रडत असताना एक खास व्यक्ती त्याच्या जवळ आली आणि त्याने त्याला धीर दिला. 

डग आऊटमध्ये रोहित शर्मा एकटाच रडत होता, त्यावेळी तिथे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बसले होते. रोहित रडत असताना राहुल यांनी त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. यावेळी त्याची पाठ थोपटलं आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकारानंतर रोहित शर्मा सावरला आणि इतर खेळाडूंशी बोलू लागला. 

टीम इंडियाचा पराभव

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमधून (T20 world cup) टीम इंडियाचा (Team india) प्रवास आज संपला. इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने (England) 10 विकेट्ने भारताचा पराभव केला. या पराभवाने सर्व भारतीय चाहते निराश झाले आहेत. तर कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) देखील अश्रू अनावर झाल्याचं कॅमेरात कैद झालंय. 

16 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडने भारताने दिलेलं 169 रन्सचं लक्ष्य पूर्ण केलं. या पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न यावर्षीही भंगलं आहे. 13 नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्यात फायनलचा सामना रंगणार आहे. 

इंग्लंडने तुफान फलंदाजी करत भारताला धूळ चारली. 24 बॉल्स आणि 10 विकेट्स राखून इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला आहे. या सामन्यात अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. हेल्सने 47 बॉल्समध्ये 86 तर 49 बॉल्समध्ये 80 रन्सची नाबाद खेळी करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारलीये. यावेळी टीम इंडियाचे गोलंदाज पुन्हा एकदा फेल गेले. भारताच्या गोलंदाजांना एकंही विकेट काढता आली नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *